रामटेक – राजू कापसे
रामटेक येथील विज्ञाननिष्ठ व्यक्तिमत्त्व रामभाऊ सेलोकर यांचे २ जून २०२३ ला वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी केलेल्या संकल्पानुसार मुलगा डॉ. बापू सेलोकर आणि सून मंजुषा सेलोकर यांनी रामभाऊ यांचे मरणोपरांत देहदान व अवयवदान केले होते. त्यांचा विज्ञानवादी विचारांचा वारसा पुढे चालवत प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त ऐच्छिक रक्तदान, देहदान व अवयवदान संकल्प नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते स्व. रामभाऊ सेलोकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करुन शिबिराला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी रामधामचे संस्थापक चंद्रपाल चौकसे, आकाशझेपचे सचिव व आम्ही भारतीय अभियानाचे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे, सृष्टी सौंदर्याची अध्यक्ष ऋषिकेश किंमतकर यांनी रक्तदान, देहदान, अवयवदान, पर्यावरण संरक्षण व संवर्धन, प्लास्टिक मुक्त व आरोग्यदायी परिसर या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी नीरज धमगाये, विजय फुलबांधे, अतुल साठोणे, बालाप्पा मन्नीकेरी, सूरज धूमाल, मयूर कश्यप, कुणाल बंगाले, उल्केश नहाले, नितेश नहाले, कार्तिक सोनटक्के (पीआय,रामटेक), सुजाता मन्नीकेरी, प्रथमेश किंमतकर, अजय तिजारे, सविनय शेंडे, सुभाष भिवगडे, मानस सेलोकर, डॉ. दिनेश कोपरकर, विशाल सेलोकर, ग्यानीवंत बारई, डॉ. बापू सेलोकर, कैलास गुल्हाने यांनी रक्तदानातून मानवतेचा संदेश देत स्वर्गीय रामभाऊ सेलोकर यांना कृतिशील श्रद्धांजली अर्पित केली.
कार्यक्रमाला डॉ. भुमेश नाटकर, राजेश बाकडे, डॉ. मनीष किंमतकर, डॉ. शब्बीर, डॉ. सतीश कंगाली, डॉ. मयूर डाखोरे, डॉ. सौ. आष्टनकर, डॉ. सौ. वाघमारे, डॉ. अभय वाळके, डॉ. अभय राजगिरे, डॉ. जीवनकर, हेमंत रेवसकर, किरण सपाटे, मीनू बुरडे, डॉ. दिनकर उल्लेवार हे प्रामुख्याने उपस्थित होते.