Saturday, July 13, 2024
spot_img
HomeBreaking Newsमूर्तिजापूर | व्यापारी दिनेश बुब यांना गंभीर जखमी करून २.५ लाख रुपये...

मूर्तिजापूर | व्यापारी दिनेश बुब यांना गंभीर जखमी करून २.५ लाख रुपये लुटणारे आरोपी जेरबंद…

नरेंद्र खवले,मूर्तिजापूर

मूर्तिजापूर : मूर्तिजापूर अमरावती राष्ट्रीय महामार्गा वरील हिंदू स्मशानभूमी नजीक शुक्रवारी रात्री तीन हल्लेखोरांनी येथील नायरा पेट्रोल पंपाच्या संचालकास रस्त्यात गाडी अडून डोळ्यात मिरचीची पूड टाकून धारदार शस्त्राने वार करून लुटल्याची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली होती. मात्र मूर्तिजापूर शहर पोलिसांनी अवघ्यां २४ तासाच्या आत या दरोड्याचा छडा लावत आरोपींना अटक केली आहे.

शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीद्वारे,फीर्यादी हे त्यांचे मालकीचे नायरा पेट्रोलपंप येथुन त्यांचे चारचाकी वाहनामध्ये बसुन घरी जात असतांना पेट्रोल पंपापासून २०० मीटर अंतरावर स्मशान भुमी जवळ अनोळखी तीन आरोपीतांनी फीर्यादी यांची कार अडवुन कारवर लाकडी दांडयाने बोनेटवर मारले. फीर्यादी हे कार खाली उतरले असता नमुद आरोपीतांनी त्यांचे डोळयामध्ये मीरची पावडर टाकुन फीर्यादी यांचे पाठीवर डाव्या बाजुस व डाव्या हातावर गुप्तीने वार करून जख्मी केले व फीर्यादी यांचे कारमध्ये ठेवलेली बॅग ज्यामध्ये नगदी २५०००० रु असे कारमधुन जबरीने काढुन त्यांचे मोटार सायकलवर बसुन तीन्ही अनोळखी इसम निघुन गेले अशा फीर्यादीचे बयान वरून पो स्टे ला अप क २२५ / २४ कलम ३९५, ३४ भादंवी चा गुन्हा दाखल करून तपासात घेतला.

सदर गुन्हयाचे तपासात मिळालेल्या गुप्त माहीतीवरून तसेच तांत्रीक माहीतीचे आधारे सदर गुन्हयात १) अनिकेत राजकुमार वर्धट वय २४ वर्ष २) सम्यक धनंजय थोरात वय २० वर्ष दोन्ही रा. प्रबुध्द नगर, वडाळी अमरावती ३) पवन उमेश दहीहंडेकर वय १९ वर्ष रा. श्रीरामनगर मुर्तीजापुर तसेच दोन विधी संर्घषीत बालक यांना वडाळी कॅम्प अमरावती येथुन ताब्यात घेवुन त्यांनी संगणमताने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने नमुद आरोपीतांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. नमुद आरोपीतांकडुन गुन्हयात वापरलेली हीरो कंपनीची पॅशन प्रो मो सा क एमएच २७ डी सी ८४६६ किं ५०००० रुची, अॅपल कंपनीचा मोबाईल किंमत ७००००रु नगदी ३१०००रू असा एकुण १५१००० रु चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीतांना सविस्तर विचारपुस करणे सुरू आहे.

सदरचा गुन्हा मा. विषेश पोलीस महानिरीक्षक श्री रामनाथ पोपळे साहेब, मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंग, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री अभय डोंगरे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मनोहर दाबाडे यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. भाउराव घुगे, पो उपनि गणेश सुर्यवंशी, पोलीस हवालदार नंदकीशोर टिकार, सुरेश पांडे, सचिन दांदळे, मंगेश विल्हेकर, पोलीस कॉस्टेबल सचिन दुबे, गजानन खेडकर, स्वप्नील खडे, भुषन नेमाडे, सायबर पो स्टे चे गोपाल ठोंबरे यांनी सदरचा गुन्हा उघड करण्यातयश मीळविले असुन पुढील तपास पो.नि. भाउराव घुगे यांचे मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: