Saturday, July 27, 2024
spot_img
Homeग्रामीणरागीट महाविद्यालयाद्वारा नगरधन येथे 'मेरी माटी मेरा देश' अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम...

रागीट महाविद्यालयाद्वारा नगरधन येथे ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम…

रामटेक 🙁 प्रतिनिधी )

रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालय रामटेक द्वारा आयोजित ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानांतर्गत व राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत दि. १०/०८/२०२३ला नगरधन येथे मा. प्राचार्य रविकांत रागीट यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरधन येथील मा. सरपंच श्रीमती मायाताई दमाहे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मारक मैदानात स्वातंत्रता आणि तिचा गौरव यांच्या रक्षणाकरीता बलिदान दिलेल्या वीरांना नमन करण्यात आले.

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाच्या पुर्तीनिमित्य नगरधन परिसरात ७५ वृक्षांची लागवड करण्यात आली. या अभियानाचे संचालन रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा ज्ञानेश्वर नेवारे यांनी केले, या कार्यक्रमास बी. ए. सी. एस. विभाग प्रमुख, प्रा. चेतना उके,प्रा. अनिल मिरासे,प्रा. अतुल बुरडकर तसेच रा. से. यो. स्वयंसेवक, यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.कळमकर, प्रा.नागदेवे. प्रा. अम्बादे, प्रा. वानखेडे, प्रा. शेंद्रे, प्रा.मेश्राम, प्रा.मडावी, प्रा. नाईक, प्रा. टेंभूर्णे, श्रीमती.समर्थ, श्री. मोहनकर, श्री. कारेमोरे, श्री ठाकरे आदींनी सहकार्य केले. व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: