Sunday, December 22, 2024
HomeSocial Trendingपरिवाराचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी सायकल दुरुस्तीचे काम करायचे..आज प्रसिद्ध IAS अधिकारी...वरुण बरनवाल यांच्या...

परिवाराचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी सायकल दुरुस्तीचे काम करायचे..आज प्रसिद्ध IAS अधिकारी…वरुण बरनवाल यांच्या संघर्षाची यशोगाथा

जर आपल्यात इच्छाशक्ती आणि दृढ आत्मविश्वास असेल तर प्रत्येक व्यक्ती आपली स्वप्ने पूर्ण करू शकतो. जगातील सर्व संकटांना मागे टाकून तो यशाच्या मार्गावर पुढे जात असतो. हीच गोष्ट पालघर जिल्ह्यातील बोईसर या छोट्याशा शहरातील वरुण बरनवाल या मुलाने खरी करून दाखवली आहे, जे आपल्या कुटुंबाला दोन वेळचे जेवण देण्यासाठी पंक्चरचे दुकान चालवून आयएएस अधिकारी बनले आहे.

एकेकाळी वरुणने शालेय शिक्षण सोडून सायकल पंक्चर दुरुस्त करण्याचे काम सुरू केले. वडिलांच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. अशा परिस्थितीत लहानपणापासूनच अभ्यासात टॉपर असलेल्या वरुणने दहावीची परीक्षा दिल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी घेतली आणि वडिलांचे सायकल दुरुस्तीचे दुकान सुरू केले. रात्रंदिवस ते पुस्तकांपासून दूर सायकलचे पंक्चर काढायचे. पण त्याचं मन सतत अभ्यासात असायचं.

दहावीचा निकाल आल्यानंतर त्याने संपूर्ण शहरात दुसरा क्रमांक पटकावल्याचे दिसून आले. मात्र पैशांअभावी त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही. अशा स्थितीत वरुणचे अभ्यासातील निष्ठा पाहून त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीने त्याला कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. पुन्हा एकदा वरुणने अभ्यासाला सुरुवात केली.

बारावीनंतर वरुणला अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. मात्र, वरुणला कॉलेजची फी भरण्यातही खूप अडचण येत होती. ते दिवसा कॉलेजला जायचे. संध्याकाळी सायकलच्या दुकानावर बसायचे आणि नंतर शिकवणी शिकवायचे. वरुणची मेहनत रंगली आणि तो इंजिनीअरिंगच्या पहिल्या सेमिस्टरमध्ये टॉप झाले. यानंतर त्यांना महाविद्यालयाकडून शिष्यवृत्ती देण्यात आली.

वरुण अभ्यासासोबतच समाजसेवेच्या कामातही व्यस्त होते. समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल विधेयकाच्या आंदोलनातही ते सहभागी झाले होते. इंजिनीअरिंग पास होताच वरुणने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

आठ वर्षांच्या मेहनतीनंतर वरुणने यूपीएससी परीक्षेत देशात ३२ वा क्रमांक पटकावला आहे. एकेकाळी सायकलचे पंक्चर दुरुस्त करणारे वरुण आज आपल्या मेहनतीच्या जोरावर आयएएस अधिकारी बनले आहे. आता ते गुजरातचे पश्चिम वीज कंपनी ली. मध्ये व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: