Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनदामोदर नाट्यगृह व सहकारी मनोरंजन मंडळ वाचवायला मा.मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे ,...

दामोदर नाट्यगृह व सहकारी मनोरंजन मंडळ वाचवायला मा.मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे , मा. श्री दीपकजी केसरकर, मा. श्री मंगलप्रभातजी लोढा….यांनी दखल घेतली…

गणेश तळेकर

प्रबोधनकार ठाकरेचं ‘खरा ब्राम्हण’ हे नाटक रंगभूमीवर गाजवणाऱ्या आणि बाळासाहेब ठाकरेंचा विशेष स्नेह असलेल्या सहकारी मनोरंजन मंडळ आणि दामोदर नाट्यगृहाच्या प्रश्नावर ताबडतोब लक्ष देण्याचा आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

सहकारी मनोरंजन मंडळाचे पदाधिकारी आणि मराठी रंगभूमीवरील रंगकर्मीच्या शिष्टमंडळाने आज मा. मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, दीपकजी केसरकर आणि मंगलप्रभातजी लोंढा यांची भेट घेतली. श्री. दिपक केसरकर यांनी या कामावर स्टे आणण्याची ग्वाही मंडळाच्या पदाधिकारी आणि उपस्थित नाट्यकर्मीना दिली। त्यामूळे काही दिवसांपासून चर्चेत असलेला दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळाचा प्रश्न सुटण्याची आशा नाट्यकर्मीमध्ये निर्माण झाली आहे.
संपर्क- श्री. रविराज नर 9324288833

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: