Friday, July 19, 2024
spot_img
Homeगुन्हेगारीखंडणी गोळा करण्याचा आरोप लावून नक्षल्यांनी केली नक्षल समर्थकाची हत्या...

खंडणी गोळा करण्याचा आरोप लावून नक्षल्यांनी केली नक्षल समर्थकाची हत्या…

गडचिरोली – मिलिंद खोंड

रविवारी सकाळी पोलीस स्टेशन कोरचीपासून 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरकुटी येथे एका नागरिकाची हत्या झाल्याची नोंद झाली आहे. गडचिरोली गोंदिया सीमेवर नामे चमरा मडावी, रा. मुरकुटी यांचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. मृतक हा कट्टर नक्षल समर्थक होता, मृताची बहीण एमएमसी परिसरातील विस्तार प्लाटून 3 ची माओवादी सदस्य असून डीव्हीसीएमची पत्नी आहे.

त्याच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या पॅम्फ्लेटमध्ये म्हटले आहे की तो आधी नक्षलवाद्यांसाठी काम करत होता पण नंतर तो अनेक कंत्राटदारांकडून नक्षलवाद्यांच्या नावावर पैसे गोळा करत होता. त्याला पोलीस खबरी म्हणूनही ओळखले गेले आहे.

नक्षलवाद्यांना राऊंड पुरवण्याच्या प्रयत्नात त्याला गेल्या वर्षी मध्य प्रदेशात बालाघाट येथे अटक करण्यात आली होती आणि काही महिन्यांपूर्वी त्याची तुरुंगातून सुटका झाली होती. या खुनाचा पुढील तपास गडचिरोली पोलीस करत आहेत.

Milind Khond
Milind Khondhttp://mahavoicenews.com
मिलिंद खोंड, गेल्या 18 वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल दुर्गम भागात पत्रकारितेचा अनुभव ..पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी..गोंडवाना विद्यापीठ येथे जन संवाद विभागात गेस्ट प्रोफेसर..तरूण भारत, हिंदुस्थान समाचार,मी-मराठी, न्यूज स्टेट वृत्तवाहिनी चा अनुभव
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: