Saturday, December 28, 2024
Homeराज्यपातुर बाळापूर रोडवरिल चिंचेच्या झाडाखाली श्रींच्या महाप्रसादाचा व दर्शनाचा हजारो भाविकांनी घेतला...

पातुर बाळापूर रोडवरिल चिंचेच्या झाडाखाली श्रींच्या महाप्रसादाचा व दर्शनाचा हजारो भाविकांनी घेतला लाभ..!

जय गजानन व “गण गण गणात बोते” च्या घोषणेने संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला.

पातुर – निशांत गवई

दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा विदर्भाचे आराध्य दैवत संत श्री गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त पातुर- बाळापुर रोडवरील जय गजानन बिछायत केंद्र पातूर येथिल चिंचेच्या झाडाखाली श्रींच्या भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा शांततेत लाभ घेतला. यावेळी संपुर्ण परिसरातील वातावरण भक्तीमय झाले होते.

श्रींच्या प्रगट दिनानिमित्त 13 फेब्रुवारी सोमवारी रोजी सायंकाळी सहा वाजता श्रींची महाआरती झाल्यानंतर श्रींच्या महाप्रसादास प्रारंभ करण्यात आला होता . तसेच भाविकांनी महाआरती साठी मोठ्या संख्येने महिलां भाविकांनी पातूर बाळापूर रोडवरील जय गजानन बीछायत केंद्रा जवळील, चिंचेच्या झाडाखाली हजारो भाविकांनी गर्दी केली होती .तसेच श्रींच्या महाप्रसादाचा व दर्शनाचाही भक्तांनी लाभ घेतला.

यावेळी जय गजानन – श्री गजानन , “गण गण गणात बोते” च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तीमय होऊन गेला होता. जय गजानन मित्र मंडळ च्या स्वयंसेवकानी व पातुर येथील श्रींच्या सेवाधार्‍यांनी अथक परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रम अतिशय शांततेत व पोलीस बंदोबस्ता शिवाय पार पडला. पातूरवासीयांनी केलेल्या सहकार्याबद्दल जय गजानन मित्र मंडळ पातुर यांनी सर्वांचे आभार मानले

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: