Monday, September 16, 2024
Homeराजकीयमूर्तिजापूर | मार खाण्यात पटाईत असलेल्या या पदाधिकाऱ्यांची ही चर्चा जोरात…

मूर्तिजापूर | मार खाण्यात पटाईत असलेल्या या पदाधिकाऱ्यांची ही चर्चा जोरात…

मूर्तिजापूर : मागील महिन्यात ठाण्यातील एका बारमध्ये भाऊच्या खास माणसाची मरेस्तोवर धुलाई करण्यात आली होती, या मारहाणीची चर्चा शहरात मोठ्या प्रमाणात पसरली होती. तर मार खाणारे हे फक्त भाऊच्या पक्षात नाहीत तर इतरही पक्षात बरेच आहेत. तर स्वतःला सदन कास्तकार असल्यास मिरवत व स्वतःला मोठा नेता समजणाऱ्या एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मराठा धाब्यावर कुत्र्यासारखा मार खाल्ला होता. मार खाणे याच्यासाठी शिल्लक गोष्ट आहे. त्याने अनेकदा मित्राकडून मार खाल्ला आहे. सर्व मारहाणीच्या घटना ह्या रात्रीच्या वेळेस घडल्या आहेत. याच्या पोटात गेल्यानंतर हा स्वतःला राजा समजतो मग कोणी असो त्याचा तो अपमान करण्याचा प्रयत्न करतो आणि मग बदाबदा मार खाऊन घरी निघून जातो.

राजकारणाचा कवळीचा अनुभव नसलेला हा पदाधिकारी स्वतःला मोठा राजकारणी समजतो, विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची शिकार करून आपली हौस पूर्ण करतो, मुंबई गाठून तेथील डान्स बार मध्येही मार खातो. मार खाण्याचे रेकॉर्ड जेवढे याच्यावर आहेत तेवढे मुर्तीजापुर शहरातील कोणतेही व्यक्तीवर नाहीत आणि हा भावी आमदाराचा सल्लागार स्वतःला समजतो. अशा या पदाधिकाऱ्यांमुळे पक्षाची मोठी बदनामी होत आहे. मात्र अश्या बदनामीची चिंता पक्ष अजिबात करीत नाही तर काही पक्षाचे मोठे नेते सुद्धा अश्याच प्रकारची शिकार करतात. त्यामुळेच अशी गत या पक्षाची असून सुद्धा भावी उमेदवारांची गर्दी ही याच पक्षात जास्त आहे. मात्र निवडून येण्याची एकाला सोडून कोणत्याही उमेदवाराची कुवत नाही…असा मार खाऊन मेरी मुर्गी की एक टांग म्हणणारा कोण? लवकरच त्याच्या नावासह cctv फुटेजसहित त्याची बातमी प्रसारित करण्यात येईल…

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: