क्रिकेट खेळून झटपट श्रीमंत झालेल्या क्रिकेटपटूंची भली मोठी यादी असून बर्याच क्रिकेटपटूंनी हॉटेल व्यवसाय सुरु केला आहे. त्याच्या पावलावर पाउल टाकत आता सुरेश रैना अलीकडेच एमस्टरडॅममध्ये भारतीय रेस्टॉरंट उघडले आहे. सुरेश रैनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. रैना यांनी दोन वर्ष अगोदर क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि आता हॉटेल व्यवसायात उतरला….
सुरेश रैनाने ट्विट करून ही माहिती दिली
“मी एमस्टरडॅममध्ये रैना इंडियन रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी अत्यंत उत्साहित आहे, जिथे माझी अन्न आणि स्वयंपाकाची आवड केंद्रस्थानी आहे. वर्षानुवर्षे, तुम्ही माझे खाद्यपदार्थ आणि माझ्या स्वयंपाकासंबंधीचे साहस पाहिले आहे आणि आता, मी भारताच्या विविध भागांतून थेट युरोपच्या मध्यभागी सर्वात अस्सल आणि अस्सल चव आणण्याच्या मोहिमेवर आहे. आम्ही एकत्र एका स्वादिष्ट साहसाला सुरुवात करत असताना या असामान्य गॅस्ट्रोनॉमिक प्रवासात माझ्यासोबत सामील व्हा. रोमांचक अपडेट्स, आमच्या स्वादिष्ट निर्मितीची झलक आणि रैना इंडियन रेस्टॉरंटच्या भव्य अनावरणासाठी संपर्कात रहा. रैना त्याची पत्नी प्रियांका रैनासोबत एमस्टरडॅममध्ये राहतो. सुरेश रैनाची मुलगी ग्रेशिया आणि मुलगा रिओही एमस्टरडॅममध्ये शिकतात.
या छायाचित्रांमध्ये सुरेश रैना स्वतः स्वयंपाक करताना दिसत आहे. एका चित्रात तो गुलाब जामुन बनवताना दिसतोय, तर दुसऱ्या चित्रात तो भाजी बनवताना दिसतोय. यादरम्यान त्यांनी हा फोटो त्यांच्या स्टाफसोबत शेअर केला. त्याच वेळी, सुरेश रैनाचा सहकारी हरभजन सिंगने त्याचे अभिनंदन केले आणि सांगितले की “मी पण जेवायला येत आहे…” सुरेश रैनाने एमएस धोनीसह 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती आणि शेवटचा तो आहे. २ वर्षांपासून आयपीएलही खेळला नाही.
I am absolutely ecstatic to introduce Raina Indian Restaurant in Amsterdam, where my passion for food and cooking takes center stage! 🍽️ Over the years, you've seen my love for food and witnessed my culinary adventures, and now, I am on a mission to bring the most authentic and… pic.twitter.com/u5lGdZfcT4
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) June 23, 2023