नांदेड – महेंद्र गायकवाड
विवाह समारंभ व इतर कार्यक्रमामध्ये तृतिय पंथिय लोकांचा हैदोस होत आहे. कुठल्याही विवाह व इतर शुभकार्यामध्ये या लोकांचा सर्व सामान्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्यामुळे जनता मोठ्या प्रमाणात हैराण आहे. विवाह प्रसंगी मंगल कार्यालयामध्ये घूसून जोर जबरदस्तीने अश्लील चाळे करून पैशाची मागणी करीत आहेत. लोकांनी स्वखुशीने दिलेल्या पैशाचा स्विकार न करता मनमानी पध्दतीने 21 हजार, 51 हजार अशा मोठ्या रक्कमेची मागणी करीत आहेत. ही मागणी पुर्ण न झाल्यास शिवीगाळ, शाप देवून नाहक त्रास देत आहेत.
तसेच अम्लीपदार्थ सेवन करून नशेत धूर्त असतात ग्राहकांना व कर्मचाऱ्यांना धमकावतात, त्यांना विनवणी करूनही ते समजून घेण्याच्या मनस्थितीत नसतात त्यांचे चार-पाच ग्रुप आहेत. या तृतिय पंथियाविरूध्द टेन्ट हाऊस, मंगल कार्यालय, केटरर्स, डेकोरेटर्स, ओनर्स वेल्फेअर असोसिएशन, नांदेड यांच्यातर्फे पोलीस अधिक्षक नांदेड यांना वैयक्तिक भेटून निवेदन देवून तृतिय पंथीय लोकांस पायबंद करण्याच्या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर श्री दडूसेठ पुरोहित महाराष्ट्र अध्यक्ष, श्री विजयसिंह परदेशी नांदेड जिल्हाध्यक्ष, आशिष नेरलकर उपाध्यक्ष, राज गोडबोले सचिव, अनिल कांबळे, अखिल गुप्ता, संभाजी जिंकलवाड, भगवान घोगरे, गोविंद घोगरे, श्री जोशी, गोविंदराव कल्याणकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.