Friday, September 20, 2024
HomeSocial Trending'द रोमॅंटिक्स'चा ट्रेलर रिलीज...पहिल्यांदाच आदित्य चोप्रा कॅमेऱ्यासमोर येणार...

‘द रोमॅंटिक्स’चा ट्रेलर रिलीज…पहिल्यांदाच आदित्य चोप्रा कॅमेऱ्यासमोर येणार…

न्युज डेस्क – बॉलिवूडचा रोमान्स किंग यश चोप्रा यांच्यावर बनवलेल्या ‘द रोमॅंटिक्स’ या माहितीपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. ‘द रोमॅंटिक्स’ यश चोप्रा आणि YRF यांच्या समृद्ध वारशाची ५० वर्षे साजरी करेल. या मालिकेत पहिल्यांदाच आदित्य चोप्रा कॅमेऱ्यासमोर येणार असून वडील यश चोप्रा यांच्या सिनेसृष्टीतील योगदानाला सलाम करणार आहे. यासोबतच या मालिकेत बॉलिवूडचे ३५ सेलिब्रिटीही दिसणार आहेत.

यश चोप्रा यांच्या जीवनावर आधारित या माहितीपट मालिकेची घोषणा करताना नेटफ्लिक्सने काल पोस्टर रिलीज केले. त्याचवेळी आज त्याचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. यासोबत नेटफ्लिक्सने लिहिले की, ‘टू डू लिस्ट ऑफ द डे – अशा व्यक्तीला शोधा जो आमच्यावर विश्वास ठेवतो, जसे त्यांनी त्यांच्यामध्ये केला होते. १४ फेब्रुवारी रोजी ‘द रोमॅंटिक्स’ द्वारे पिढ्यांसाठी जादू आणि प्रेम निर्माण करणाऱ्या कथाकाराची कथा साजरी होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: