Sunday, December 22, 2024
Homeराज्यनागपूर | अभिनव संकल्पनेतून साकारलेल्या बांबू रे बांबू चें प्रकाशन…

नागपूर | अभिनव संकल्पनेतून साकारलेल्या बांबू रे बांबू चें प्रकाशन…

बांबुवरील कवितांचा प्रायोगिक संग्रह…

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर -बांबू या एकमेव विषयाला वाहिलेल्या बांबू रे बांबू” या काव्य संग्रहाचे प्रकाशन शनिवारी जयप्रकाश नगर येथील कार्यालयात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ बांबू आर्किटेक्ट सुनिल जोशी, बांबू सोसायटी ऑफ इंडियाचे विदर्भ शाखा अध्यक्ष अजय पाटिल, रायपूर चे बांबू उद्योजक मनन पटेल, प्रगतिशील शेतकरी विजय टोंगे आणि बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या सदस्य कवयित्री मीनाक्षी वाळके यांची उपस्थिती होती.

बांबू क्षेत्रात अजूनही चांगले काम होउ शकते. बांबू क्षेत्रात भविष्यात मोठया संधी असुन विदर्भात भरपूर वाव आहे. अलीकडे विदर्भाने या बाबतीत वेग घेतला आहे. त्याला प्रोत्साहन देण्याचं धोरण असल्याचं यावेळी गडकरी म्हणाले. “बांबू रे बांबू” या काव्य संग्रहाची अभिनव संकल्पना कवयित्री मीनाक्षी वाळके यांनी गडकरी जी यांना सांगीतली. असे प्रयोग होत रहावे यासाठी श्री गडकरी यांनी कवयित्री मीनाक्षी वाळके यांना शुभेच्छा दिल्या.

बांबू क्षेत्रतल्या जाणकारांकडून नव्या संकल्पना घेऊन शासनाने पूरक धोरणे आखावित अशी अपेक्षा यावेळी बांबू सोसायटी ऑफ इंडिया कडून कऱण्यात आली. देशाच्या बांबू क्षेत्राचा विकास व्हावा म्हणुन सदैव प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी गडकरी यांनी दिलें. दरम्यान बांबू उद्योजकांच्या एका शिषटमंडळाने गडकरी यांचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.
डीऑन पब्लिशिंग हाऊस ने प्रकाशित केलेल्या “बांबू रे बांबू” या संग्रहात 36 कविता असुन त्यात बांबूचे सर्वच कंगोरे टिपले आहेत.

बांबूचा मानवाशी संबंध, त्याचा भूगोल आणि इतिहास तसेच वेळोवेळी झालेल्या विकासासोबतच आधुनिक प्रयोगांना सुध्दा स्थान देण्यात आले आहे. अबाल वृद्धांना सहज समजेल इतक्या साध्या भाषेत या कविता आहेत. कवयित्री मीनाक्षी वाळके या मुळात बांबू कलावंत, प्रशिक्षक आणि बांबुतून महिला सक्षमीकरणाचे काम करणाऱ्या सेवाभावी कार्यकर्त्या असुन गोंडवाना विद्यापीठात बांबूच्या अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही त्या सक्रिय आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: