Thursday, December 5, 2024
Homeराज्यसंत गमाजी महाराज शिक्षण संस्थेद्वारा गुणवंत विध्यार्थी सत्कार सोहळा…

संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेद्वारा गुणवंत विध्यार्थी सत्कार सोहळा…

शिक्षणातूनच राष्ट्रानिर्मिती – माजी मंत्री सुनील केदार…

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर -हिंगणा-आजच्या विद्यार्थ्यांचा बुध्यांक खूप मोठा आहे फक्त गरज आहे त्याला योग्य चालना देऊन शिक्षण देण्याची शिक्षणातूनच खऱ्या अर्थाने राष्ट्राची निर्मिती होते. अलीकडच्या सरकारचं धोरण हे विद्यार्थी विरोधी असून आपण काल सादर झालेला राज्याचा अर्थसंकल्प पाहिला तर त्यात शिक्षणासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने काहीच तरतूद केलेली दिसून येत नाही ही शोकांतिका आहे असे विचार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुनील केदार यांनी हिंगणा येथील संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेद्वारा आयोजित वर्ग दहावी व वर्ग बारावीतील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्या प्रसंगी व्यक्त केले.

पुढे बोलताना केदार यांनी शिक्षकांनी जेवढं जास्त ज्ञान देता येईल तेवढं जास्त ज्ञान देऊन विद्यार्थी घडवा कारण या राष्ट्राची निर्मिती करण्याची संधी शिक्षकांना मिळाली आहे असे म्हणाले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष रमेशचंद्र बंग होते.

प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ साहित्यिक सुप्रसिद्ध वक्ते बाळासाहेब कुलकर्णी तर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते दिनेश बंग, जिल्हा परिषद सदस्य दुधाराम सव्वालाखे , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष योगेश सातपुते, हिंगणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव आव्हाळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वानाडोंरी शहराध्यक्ष हरिभाऊ रसाळ, पंचायत समिती सदस्य पौर्णिमा दीक्षित, संस्थेचे कोषाध्यक्ष महेश बंग, संस्थेच्या उपाध्यक्ष अरुणा बंग, सुशील दीक्षित आदी प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थ्यांना संबोधित करताना बाळ कुलकर्णी यांनी गुणपत्रिका की गुणवत्ता या विषयावर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी योग्य संगतीने गुणपत्रिकेतील गुणांपेक्षा जीवनात गुणवत्ता निर्माण करावी असे विचार मांडले तर अध्यक्ष स्थानावरून बोलताना माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी हिंगणा तालुक्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे हेच ध्येय बाळगून संस्था उभी केल्याचे सांगितले.

यावेळी हिंगणा तालुक्यातील मराठी माध्यमातून प्रथम आलेली शाळेची विद्यार्थिनी अपेक्षा सोमनकर 96.60% व इंग्रजी माध्यमातून प्रथम आलेला स्व देवकीभाई बंग इंग्रजी माध्यम विद्यालयाचा विद्यार्थी भावेश निवांत 96% गुण तर नेहरू कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी सुशांत राजपूत जेईई च्या परीक्षेत देशातून 956 वा क्रमांक प्राप्त करून आयआयटी खडकपूर येथे प्रवेश मिळवला यांच्यासह हिंगणा तालुक्यातील 200 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश बंग यांनी केले सूत्रसंचालन आनंद महल्ले तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष अरुणा बंग यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वी ते करिता स्व देवकी बाई बंग विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन तुपेकर ,नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शशिकांत मोहिते व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: