सांगली – ज्योती मोरे.
महानगरपालिकेने शेरीनाल्याचे तसंच वसंतदादा शेतकरी साखर कारखान्यातील दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी प्रक्रिया न केलेले पाणी माधवनगर नाल्याच्या मार्फत नदीत सोडले शिवाय वसंतदादा शेतकरी साखर कारखान्यातील स्वप्नपूर्ती शुगर लिमिटेडचेही स्पेंट वॉश नदीत सोडल्याने पाणी प्रदूषणासह माशांच्या मृत्यूस हे सर्वजण कारणीभूत असल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आदेश जारी करून कारखाना बंद करण्याचे आणि पुढील आदेशापर्यंत कोणतेही उत्पादन न करण्याचे आदेश यावेळी दिल्याचं प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अवताडे यांनी सांगितले आहे.शिवाय शेरीनाल्याबाबत महापालिकेवर खटला दाखल करण्यासाठी मंजुरी मागवली असून, ती आल्यानंतर सदर खटला दाखल करणार असल्याचेही अवताडे यांनी म्हटले आहे.