Monday, December 23, 2024
HomeSocial Trendingदिलासादायक! पुढच्या २४ तासात थंडीचा जोर कमी होणार, 'या' भागात पावसाची शक्यता,...

दिलासादायक! पुढच्या २४ तासात थंडीचा जोर कमी होणार, ‘या’ भागात पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज…

अमोल साबळे

सध्या नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. अशातच उत्तर भारतातील नागरिकांसाठी दिलासा देणारी बातमी हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.सध्या देशभरात थंडीची लाट पसरली आहे. अनेक राज्यात थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत उत्तर भारतात थंडीचा जोर अधिक आहे.

थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक ठिकठिकाणी शेकोट्या पेटवत आहेत. दरम्यान, कडाक्याच्या थंडीचा सामना करणाऱ्या उत्तर भारतातील नागरिकांसाठी दिलासा देणारी बातमी हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. येत्या 24 तासात थंडीची लाट कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

थंडीचा जोर वाढल्यामुळे उत्तर भारतात जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच हवामान विभागाने एक दिलासादायक बातमी दिली आहे. पुढच्या 24 तासाचा थंडीचा रोज कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवली आहे. दिल्ली आणि आसपासच्या भागात तापमान 2 ते 3 अंशांनी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, त्यानंतर काही भागात पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.

22 आणि 23 जानेवारीला पंजाबच्या काही भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आहे. 24 आणि 25 जानेवारीलाही पावसाची शक्यता आहे. 22 जानेवारीला दिल्लीसह चंदीगड आणि हरियाणामध्ये पावसाची शक्यता आहे. 23 आणि 24 जानेवारी रोजी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

25 जानेवारीलाही दुर्गम भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात 23 जानेवारीला काही भागात तर 24 जानेवारीला बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. 24 आणि 25 जानेवारीला पूर्व उत्तर प्रदेशात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: