Sunday, July 21, 2024
spot_img
Homeराज्यमहावितरण कागल उपविभाग अंतर्गत सुरक्षा सप्ताह शिबिर संपन्न - उपकार्यकारी अभियंता विनोद...

महावितरण कागल उपविभाग अंतर्गत सुरक्षा सप्ताह शिबिर संपन्न – उपकार्यकारी अभियंता विनोद घोलप…

कोल्हापूर – राजेंद्र ढाले

कागल दि -19/012023 रोजी कागल उपविभागा अंतर्गत वीज वितरण मधील अग्रगण्य असणारी महावितरण कंपनी मार्फत दि 15 जानेवारी ते 23 जानेवारी सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे , आज महावितरण उपविभाग कागल अंतर्गत गहिनीनाथ उपकेंद्र येथे हा सुरक्षा सप्ताह पार पडला ,या कारेक्रामाचे प्रमुख पाहुणे लाभले ते कोल्हापूर ग्रामीण विभाग 2 चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री संजय शिंदे व या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कागल उपविभागचे उपकार्यकारी अभियंता श्री विनोद घोलप हे होते.

सध्या महाराष्ट्रातील सर्व महावितरणच्या परिमंडळ कार्यालया अंतर्गत या सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं असून कोल्हापूर परिमंडळचे अधीक्षक अभियंता परेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सर्व विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.आजच्या कार्यक्रमात कर्मचारी यांनी वीज वितरण, लाईन, रोहित्र, लघुदाब वाहिनी वर काम करत असताना कोणती सुरक्षेची साधने वापरावीत, अर्थिंग रॉड लावून लाईन वरचे काम कसे करावे,

पोल वर काम करत असताना घ्यावयाची काळजी याबद्दल साहाय्यक अभियंता विश्वास चौगुले यांनी ऑपरेटर्स लाईन स्टॉप यांना मोलाचे मार्गदर्शन केले कसबा सांगावचे सहाय्यक अभियंता तानाजी कोरवी डे वो राॅड कशा पद्धतीने त्याचा वापर करावा व त्याची काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले ऑपरेटर दिगंबर पवार यांनी प्रत्येक फिडर वाईज याबद्दल अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय शिंदे यांनी मार्गदर्शन केले , तसेच उपकार्यकारी अभियंता विनोद घोलप यांनीही सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत काळजीपूर्वक काम करण्याचा सल्ला दिला , यावेळी सहायक अभियंता तानाजी कोरवी यांनीही डी ओ रॉड वर अर्थींग करून काम कसे करावे यासाठी मार्गदर्शन केले,

तर ऑपरेटर दिगंबर पोवार यांनीही प्रत्येक फिडर वाईज वेगवेगळे अर्थिंग करणे गरजेचे आहे असे विनंती वरिष्ठांना केली यावेळी कागल उपविभागीय उपकार्यकारी अभियंता विनोद घोलप यांनी बोलताना महावितरण ही महाराष्ट्रातील अग्रगण्य नामांकित कंपनी असून महावितरण मध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा जीव हा अतीश महत्त्वाचा आहे आपण प्राधान्य कडे सुरक्षा साधने वापरून आपण आपल्या जीवाची काळजी घेऊया आणि आपल्या कंपनीसह आपल्यावर कुटुंबाची जबाबदारी असते जसे आम्ही थकबाकी वसुलीसाठी वेळोवेळी सुचना देत असतो,

आणि ती आपण वसुली सुद्धा आपण सर्वजण प्रामाणिक करत असतात पण आपल्या सुरक्षा बाबतीत ही काही अडचणी असल्यास संबंधित शाखा कार्यालयाचे सहायक अभियंता यांना किंवा स्वतः मला एक उपकार्यकारी अभियंता आणि आपला कुटुंब प्रमुख म्हणून कल्पना द्यावी त्यामध्ये आम्ही नक्कीच सुधारणा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू तसेच ग्रामीण विभाग दोनचे अतिरिक्त अभियंता श्री संजय शिंदे सुरक्षेच्या दृष्टीने आपण काम करत असताना,

मग ते एल टी एलेवन के.व्हि एच टी लाईन असेल आपण स्वता संबंधित उपकेंद्राचे ऑपरेटर यांच्याकडून लेखी परमिट घेऊन सदर ऑपरेटरने उपकेंद्रातून योग्यरीत्या लाईन बंद केल्याची खात्री करून आपण स्वतः काम करत असलेल्या ठिकाणी आर्थिक रोड लावून काम करावे आपण काम करत असल्याल्या संबंधित फिडर आणखी कोणता फिडर क्रॉस आहे का याची ही खात्री काळजीपूर्वक करावी आणि कंपनीने दिलेल्या सर्व सुरक्षा साधनांचा काम करताना वापर करावा सूचना दिल्या. आणि सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने सर्वांनी सुरक्षेची काळजी घ्याल ही अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी गोकुळ शिरगाव एम. आय. डी.सी .चे साहाय्यक अभियंता सुहास शिंदे गोकुळ शिरगाव ग्रामीणचे साहाय्यक अभियंता राजेंद्र कांबळे कागल अर्णबनच्या कु.विना मठकर , सिद्धनेर्ली चे सहायक अभियंता अभिलाष बारापत्रे , आर के नगर सहायक अभियंता विश्वास चौगुले , कागल ग्रामीण चे कनिष्ठ अभियंता अजय पोवार , कसबा सांगाव सहायक अभियंता तानाजी कोरवी , म्हाकवेचे सहायक अभियंता श्रेयस कूसाळे , गुणवत्ता परीक्षण चे सहायक अभियंता महेश पाटील ,युडीसी शौकत मुलाणी , शिपाई सोम स्वामी यांच्या सहित उपविभाग कागल अंतर्गत कर्मचारी , बह्यात्रोत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: