Friday, September 20, 2024
HomeBreaking NewsA.R.A.च्या जातीयवादी धोरणाने लाखो बौद्ध विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी !...पुरोगामी पत्रकार संघ पाठपुरावा...

A.R.A.च्या जातीयवादी धोरणाने लाखो बौद्ध विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी !…पुरोगामी पत्रकार संघ पाठपुरावा करणार…

नरेंद्र सोनारकर, चंद्रपूर

चंद्रपूर-शालेय टीसी वर बौद्ध नमूद असलेले विद्यार्थी अनुसूचित जातीत मोडत नाहीत,असा नवीन जावई शोध प्रवेश नियामक प्राधिकरण समितीने लावला असून,या मुळे राज्यात नव्या वादाला तोड फुटले आहे…

भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरानीं 14 ऑकटोंबर 1950 साली बौद्ध धम्माची दिक्षा घेतली व आपल्या लाखो बौद्ध बांधवांना बौद्ध धम्माची दिक्षा देऊन जनावरां पेक्षाही हीन वागणूक मिळत असलेल्या महार समुदायाला माणुसपण बहाल केले…त्यानंतर मोठी समाजिक क्रांती झाली.शैक्षणिक क्षेत्रात तर बौद्धांनी चमत्कारिक यश संपादन केले.आणी बाबासाहेबांचा सन्मान म्हणून अनेक पालकांनी आपल्या पाल्यांच्या शालेय टीसी वर महार या जातीच्या ठिकाणी ‘बौद्ध’ म्हणून नमूद केले…

अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 1950 च्या पुराव्यांची अट असल्याने टीसी वर जरी ‘बौद्ध’ नमूद असले तरी पुरावे हे महार जातीचेच जोडल्या जात असल्याने जात प्रमाणपत्र व जात वैद्यता प्रमाणपत्रही महार म्हणूनच देण्यात येते.बौद्ध आणी नवबौद्ध हे अनुसूचित जातीत 37 नंबर वर येत असल्याचे महाराष्ट्र आणी केंद्र शासनाचे स्पष्ट निर्देश असतांन्ही टीसी वर बौद्ध आणी जात प्रमाणपत्र तथा जात वैद्यता प्रमाणपत्र महार असल्याच्या सबबी खाली प्रवेश नियामक प्राधिकरण समिती मुंबईच्या अध्यक्ष आणी सचिवाने टीसी वर बौद्ध नमूद आहे म्हणून डॉ.सौ.वसुधा झाडे नर्सिंग कॉलेज चंद्रपूरच्या कु.श्रेया नवशत्रू तांबेकर या विध्यार्थिनीचा प्रवेश नकारण्याचे पत्र महाविद्यालयाला दिले आहे.या पत्रा मुळे एकच खळबळ उडाली असून,जात प्रमाणपत्र ,जात वैधता प्रमाणपत्र असूनही टीसी वर बौद्ध असणाऱ्या विद्यार्थ्यी आणी पालकांना थरकाप सुटला आहे.राज्यात टीसी वर बौद्ध नमूद असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लखोंच्या घरात असून,या समितीला जात प्रमाणपत्र,जात वैधता प्रमाणपत्र महत्वाचे नसून टीसी वरील बौद्ध नमूद असलेले खटकत आहे काय?असा सवाल उपस्थित होत आहे.

या संबंधाने पुरोगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य संघटक नरेंद्र सोनारकर यांनी प्रवेश नियमक प्राधिकरण समिती,मुंबई यांना निवेदन देऊन समितीने बौद्ध समातील विद्यार्थ्यावरील आकस पूर्ण दुर्व्यवहार त्वरित थांबविण्याची विनंती केली आहे.दरम्यान समितीच्या या आकसपूर्ण धोरणामुळे राज्यातील अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे,होत आहे…समितीने शासन निर्णया प्रमाणे बौद्ध,नवबौद्ध विद्यार्थ्यांना अनुसूचित जातीत गृहीत धरून आपले जातीयवादी धोरण तात्काळ मागे घ्यावे,अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात समितीच्या जातीयवादी धोरणा विरुद्ध तीव्र आंदोलन उभारले जाईल तथा समितीतील अध्यक्ष आणी सचिवावर अनुसूचित जाती,जमाती अन्याय अत्याचार निर्मूलन कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करू,असेही निवेदनातून स्पष्ट केले आहे.

दरम्यान टीसी वर बौद्ध नमूद असलेले विद्यार्थी अनुसूचित जातीत मोडत नाही,असा नवीन जावई शोध समितीने लावला असून,यामुळे मेडिकल,इंजिनियर,नर्सिंग करणाऱ्या लाखो बौद्ध विध्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अधांतरी टांगल्या गेले आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: