T20 World Cup 2024 : T20 विश्वचषक स्पर्धेत प्रेक्षकांना पाहिजे तशी मजा येत नसल्याने क्रिकेट प्रेमी नाराज होऊ लागले होते, मात्र आज वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात पुन्हा T20 चा थरार सुरु झालाय. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची तुफानी शैली पाहायला मिळाली. या सामन्यात अफगाणिस्तानची भक्कम गोलंदाजी विंडीजच्या फलंदाजांनी उद्ध्वस्त केली. या सामन्यात वेस्ट इंडिजने टी-20 विश्वचषकाचा खास विक्रमही केला आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने टी-20 विश्वचषक 2024 ची सर्वोच्च धावसंख्याही बनवली आहे.
वेस्ट इंडिजने 218 धावा केल्या
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 20 षटकात 5 गडी गमावून 218 धावा केल्या. जी या मोसमातील सर्वात मोठी धावसंख्या आहे. याशिवाय पॉवरप्लेमध्येही वेस्ट इंडिजने सर्वाधिक धावा केल्या आहेत. T20 विश्वचषकाच्या इतिहासात आजपर्यंत कोणत्याही संघाला पॉवरप्लेमध्ये एवढी मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. वेस्ट इंडिजने पॉवरप्लेच्या 6 षटकांत एक गडी गमावून 92 धावा केल्या. टी20 विश्व इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा पॉवरप्ले स्कोअर आहे.
या सामन्यात निकोलस पूरनची खेळी वादळ
या सामन्यात विंडीजसाठी यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरनने अप्रतिम कामगिरी केली. या सामन्यात पुरणने शानदार फलंदाजी करत ५३ चेंडूत ९८ धावांची खेळी केली. या खेळीत पूरणने 6 चौकार आणि 8 षटकार मारले. ज्याच्या एका षटकात निकोलस पुरनने 36 धावा दिल्या.
या सामन्यात पुरणने माजी दिग्गज फलंदाज ख्रिस गेलला मागे टाकत एक विशेष कामगिरी केली आहे. पूरण आता T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये पुरणच्या नावावर आता 128 षटकार आहेत. यापूर्वी हा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर होता. ख्रिस गेलच्या नावावर 124 षटकार आहेत.