Saturday, July 13, 2024
spot_img
Homeराज्यतुमसर वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; मात्र, विज पडुन बैलजोडी ठार...

तुमसर वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; मात्र, विज पडुन बैलजोडी ठार…

तिरोडा – श्रावण बरेकर

तुमसर तालुक्यातील गर्रा/बघेडा येथे १७ जुन रोजी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली दरम्यान शेतातील आंब्याच्या झाडाखाली बांधुन ठेवलेल्या बैलजोडीच्या अंगावर विज पडल्याने बैलजोडी जागीच ठार झाल्याची घटना १७ जुन जुन रोजी दुपारी तिन वाजता दरम्यान घडली. गंगाधर आत्माराम घोडमारे रा.गर्रा) बघेडा असे पशुपालक शेतकऱ्यांचे नाव आहे.

गर्रा/बघेडा येथिल घटना

घटनेच्या दिवशी पशुपालक शेतकरी गंगाधर घोडमारे यांच्या मालकीची बैलजोडी शेतातील आंब्याच्या झाडाखाली बांधुन ठेवलेल्या बैलजोडीच्या अंगावर विज पडल्याने बैलजोडी जागीच ठार झाली. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पशुपालक शेतकरी गंगाधर घोडमारे व नागरीकानी धाव घेतली.

तुमसर तालुक्यातील सदर घटनेची माहिती तलाठी यांना देण्यात आली. विज पडुन बैलजोडी ठार झाल्याने शेतकरी गंगाधर घोडमारे यांचे एक लक्ष रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांला शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी नागरिकांनी केली आहेत

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: