महेंद्र गायकवाड
नांदेड
नांदेड जिल्ह्यात ऑफरेशन प्लॅश आउट नुसार अवैध धंदयावर कार्यवाही करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी विशेष पथके तयार करुन पथकातील अधिकारी व अमंलदार यांना अवैद्य धंदयावर कार्यवाही करणेबाबत आदेश दिले असून विशेष पथकाने देगलूर-उदगीर रोडवर एक राशनने भरलेला ट्रक ताब्यात घेतला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार हे दिनांक 10 सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन देगलुर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय बातमीदाराने दिलेल्या माहितीवरुन देगलूर ते उदगीर रोडवर मोजे कारेगांव येथे एक आयचर वाहन क्रमांक एम. एच.26 बि. डी.8051 वाहन थांबवून सदरचे वाहन चेक केले असता नमुद वाहनात गहु व तांदळाने भरलेले 115 कटटे किमत अंदाजे 1,20,000/- रु चा रेशनचा माल मिळुन आला. त्यावरुन सदर ट्रक क्रमांक एम. एच.26 बि. डी.8051 कि.अं. 22,00,000/- रु व ट्रक मध्ये असलेला मुददेमाल किं.अं. 1,20,000/- असा एकुण 23,20,000 रु चा माल व ट्रकचालकास ताब्यात घेउन पोलीस स्टेशन देगलुर येथे हजर केले आले आहे. या प्रकरणी पुरवठा विभागाचा अहवाल मागवुन पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याची माहिती मिळाली आहे.
सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील सपोनीव्ही.एस. आरसेवार, पोह पोतदार, पोह मुंढकर, पोना तलवारे, पोकॉ.येंगाले, पो कॉ.वाघमारे यांनी पार पाडली.