खामगाव – हेमंत जाधव
खामगाव येथील सुप्रसिध्द साहित्यिक तथा स्तंभलेखक प्रा.मधुकर वडोदे यांना स्व.सुरेश लांडे स्मृती “साहित्य सेवा” पुरस्कार जाहीर झाला. जेष्ठांचा सन्मान व नवोदितांना प्रोत्साहन हे ब्रीद असलेल्या अंकुर साहित्य संघ महाराष्ट्र अकोला च्या वतीने देण्यात येणारा हा अत्यंत प्रतिष्ठा जोपासला जाणारा पुरस्कार या वर्षी दोन दिवशीय आयोजित केलेल्या अकोला येथे दिनांक 23 व 24 डिसेंबर रोजी 61 व्या अखिल भारतीय मराठी अंकुर साहित्य संमेलनामध्ये संमेलन अध्यक्ष प्राचार्य तथा साहित्यिक डॉ. साधनाताई निकम यांच्या हस्ते तर संमेलन उद्घाटक मा.प्रा.डॉ. संतोष हुसे,केंद्रीय कार्याध्यक्ष तुळशीराम बोबडे,अंकुर साहित्य संघाचे अध्यक्ष हिम्मतराव ढाले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार असून त्याबाबतचे निवडपत्र पाठवून त्यांचे अभिनंदन केले आहे.
प्रा.मधुकर वडोदे यांना 2023 या वर्षातील हा सहावा पुरस्कार असून याआधी डॉ. गायकवाड मेमोरियल फाउंडेशन व सहर ए अकादमीच्या वतीने “भक्ती गौरव” पुरस्कार, संत गाडगे महाराज अध्यासन संथा कोल्हापूर यांचे कडून “भक्ती वांड्मय” राज्यस्तरीय पुरस्कार, पद्मगंधा प्रतिष्ठाण नागपूर यांनी उत्कृष्ट वाड्मय कथा संग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार, बुलढाणा जिल्हा नागरिक मंडळ,नागपूर च्या वतीने “बुलढाणा जिल्हा सन्मान” विदर्भस्तरीय पुरस्कार,झेप या मराठवाडा साहित्य संघ, छ. संभाजी नगर. यांनी वैचारिक लेखनास “मातोश्री हरणाबाई जाधव”आणि आता समग्र साहित्य व त्यासंदर्भातील सातत्याने करीत असलेले लेखन लक्षात घेता स्व.सुरेश लांडे स्मृती “साहित्य सेवा”पुरस्कार घोषित झालेला आहे.
58 व्या अ.भा.मराठी अंकुर साहित्य संमेलनाध्यक्ष पद सुद्धा सांभाळले आहे. त्यांचे आतापर्यंत 10 ग्रंथ प्रकाशित झाले असून या समग्र साहित्यावर चिकित्सक अभ्यास अमरावती विद्यापीठा मध्ये पी.एच. डी .करिता एका विद्यार्थ्यांचे नामांकन झाले आहे.प्रा.मधुकर वडोदे यांना महाराष्ट्रातील अनेक नामवंत संथानी यापूर्वी प्रतिष्ठचे पुरस्कार देऊन गौरविले आहे.
अत्यंत प्रतिष्ठा असणारा हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अनेक साहित्यिक मित्रानी त्यांचे अभिनंदन केले आहे.असे अंकुर साहित्य संघाचे जिल्हाध्यक्ष शालिग्राम वाडे यांनी कळविले आहे.