Saturday, July 27, 2024
spot_img
Homeखेळदिव्यांगांच्या जिल्हास्तरिय क्रिडा स्पर्धा निवड चाचणी संपन्न...

दिव्यांगांच्या जिल्हास्तरिय क्रिडा स्पर्धा निवड चाचणी संपन्न…

खामगाव – हेमंत जाधव

बुलढाणा जिल्ह्यातिल पहिल्या पँरा आँलंपिक क्रिडा स्पर्धा आज दि.१० डिसेबर भारतरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर न.प.मैदान खामगाव येथे दिव्यांग संस्था असलेल्या विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशन नगर परिषद खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बुलढाणा जिल्हा पँरा आँलंपिक असोशिएशन च्या माध्यमातुन क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

या कार्यक्रमाचे ऊद्धाटक म्हणुन बुलढाणा जिल्हा क्रिडा अधिकारी बाळक्रुष्ण महानकर तर प्रमुख ऊपस्थितीमध्ये
माजी आमदार दिलीपकुमार सानंदा,काँटन मार्केट सभापती सुभाषभाऊ पेसोडे,माजी नगराध्यक्षा सरस्वतीताई खाचणे,युवा नेते तेजेंद्रसिग चव्हाण,ऊद्बोजक व मार्गदर्शक विपीनजी गांधी,विनोदभाऊ डिडवाणीया,भाजपा दिव्यांगसेल जिल्हा अध्यक्ष अंबादास निंबाळकर,राष्ट्रवादी दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष रामदास सपकाळसर ,सरचिटणिस चंद्रकांत शिंदे,

दिव्यांग फाऊन्डेशन अध्यक्ष निलेशभाऊ चोपडे,वंचित दिव्यांग सेलचे बापुनाना दामोदर,रुषीकेशभाऊ ऊन्हाळे,ब्लाँईंड फेडरेशनचे रामेश्वर टेकाळे,मुकबधिर संधटनेचे जिल्हाप्रमुख अबदुल्ला ,तानाजी आखाड्याचे प्रसाददादा तोडकर ,नँशनल शाळेच्या मुख्याधिपीका प्रमिला प्रविण शहा, खामगावचे तहसिलदार अतुल पाटोळे,शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार नरेद्र ठाकरे,तर कार्यक्रमाचे अध्यक्षपद गजानन लोखंडकार यांनी भुषविले या कार्यक्रमाला नुकताच महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय तलवारबाजी खेळाडु अनुराधा सोळंके,

आंतरराष्ट्रीय खेळाडु अलकाताई चव्हाण,रंजनाताई शेवाळे यांची सुद्धा ऊपस्थिती लाभली यामध्ये गोळाफेक थालीफेक,१००मीटर धावणे आदी स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये अनुक्रमे प्रथम द्वितीय,त्रुतिय असे प्रमाणपत्र व शिल्ड खामगाव प्रेस कल्ब अध्यक्ष किशोर भोसले,अखिल ग्रामिण पत्रकार संधाचे जिल्हाध्यक्ष अनुप गवळी,कार्याध्यक्ष संभाजीराव टाले कुणाल देशपांडे यांच्या हस्ते विजयी झालेल्या स्पर्धकांना देण्यात आले या क्रिडांसाठी पंच म्हणुन मो.शकिल सर,न.प.चे शरद ईंगळे सर, मापारीसर,तिडकेसर,अमोल ईंगळे सर,राऊळसर, ठाकितेसर,ऊस्मानसर यांनी काम पाहिले.

या स्पर्धेदरम्यान कुठल्याही दिव्यांग खेळाडुला दुखापत झाल्यास तत्काळ वैद्यकिय सुविधा ऊपलब्द व्हावी याकरिता खामगाव शहर युवासेना प्रमुख राहुल कळमकार यांनी ऊपस्थित राहत रुग्णवाहिका ऊपलब्द करुन दिली
तर ऊपस्थित मान्यवरांनी दिव्यांग हितार्थ तसेच विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशनच्या कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले.

जिल्हास्तरिय पँरा आँलंपिक क्रिडा स्पर्धेसाठी अथक परिश्रम विराट मल्टीपर्पज फाउन्डेशन नगर परिषदच्यावतिने क्षत्रुधन ईंगळे,मिलींद मधुपवार,वसंत चिखलकर,शेखर तायडे,गजानन कुळकर्णी,कविता ईंगळे,पद्माकर धुरंधर,शिवशंकर कुटे,मो.रईस,महादेव पांडे,पापा मुकते,अमोल भोलनकर,मोहन नेमाने सुरेद्र चव्हाण,तानाजी तांगडे भागवत सुतोने यांनी घेतले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मिलींद मधुपवार यांनी केले तर आभार प्रदर्शन विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशन अध्यक्ष मनोज नगरनाईक यांनी केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: