कोल्हापूर – राजेंद्र ढाले
नेर्ली विकासाडी गावातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी डॉ.डी.वाय.पाटील कूषी तंत्रज्ञानांची माहिती घेतली.नेर्ली विकासवाडी ग्रामपंचायतीने या अभ्यास सहिलीचे आयोजन केले होते या अभ्यास दौरा सहिलीच्या निमित्ताने गावातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञान वापरून शेती करावी हा उद्देश ठेवून या सहलींचे नियोजन नेर्ली विकासवाडी वतीने गोकुळ संचालक व लोकनियुक्त सरपंच प्रकाश पाटील यांनी केले.
विद्यापीठाला भेट देऊन तेथील कूषी तंत्रज्ञानांची माहिती घेतली.नेर्ली विकासवाडी ग्रामपंचायतीने या अभ्यास सहलींचे नियोजन केले होते.प्रा.दिपक पाटील, विश्वास चव्हाण यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी ग्रामविकास अधिकारी एस.आर.हासुरे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हंबीराव पाटील जनार्दन पाटील राहुल पाटील विठ्ठल धनगर संदिप कदम बाळु डुम अमर पाटील प्रदिप चौगुले रायगोडा धनगर नागेश चौगुले बंडा सिध्दनेर्ले भगवान पाटील व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.