पातुर – निशांत गवई
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला तसेच पातुर तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी आंतरशालेय क्रीडा स्पर्धा राबविण्यात येतात.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी संपन्न झालेल्या पातुर तालुका बुद्धिबळ स्पर्धेमध्ये पातुर येथील सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्रीमती लक्ष्मीबाई देशपांडे वरिष्ठ मराठी प्राथमिक शाळा कान्होबा चौक पातुर येथील अनुज नंदकिशोर कुटे व शिव रमेश सातव या विद्यार्थ्यांनी बुद्धिबळ स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी आपला प्रवेश निश्चित केला.
या विजयी स्पर्धकांना त्यांचे क्रीडाशिक्षक उमेश राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या चमकदार कामगिरीबद्दल त्यांचे संस्थेचे संस्थापक /सचिव मा. श्री रामसिंगजी जाधव साहेबांनी कौतुक केले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका कु.वंदना सरप यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकांनी या दोन्ही विजयी स्पर्धकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या पातुर तालुका बुद्धिबळ स्पर्धेकरिता क्रीडा संयोजक विठ्ठल लोथे, मुनावर खान, पंकज राणे, संजय खडके आदी क्रीडा शिक्षकांनी पंच म्हणून काम पाहिले. विद्यार्थ्यांच्या या नेत्र दीपक कामगिरीबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.