Sunday, October 13, 2024
Homeराज्यबल्लारपुरात एकाच दिवशी दोन बलात्कार, पीडित अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन केली आत्महत्या…

बल्लारपुरात एकाच दिवशी दोन बलात्कार, पीडित अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन केली आत्महत्या…

चंद्रपूर – नरेंद्र सोनारकर

बल्लारपूर शहरात एकाच दिवशी बलात्काराच्या दोन घटना उघडकीस आल्याने जिल्हयात एकच खळबळ उडाली आहे.अलीकडे देशात होत असलेल्या बलात्कार अत्याचाराच्या घटनेला उत आला असतांना अशा घटनांचे सत्र सुरु असल्याने मुलींच्या पालक वर्गात दहशत निर्माण झाली आहे.

प्राप्त माहिती नुसार एका ३५ वर्षीय मतिमंद महिलेवर बलात्कार झाला आहे. सदर महिला मतिमंद असून ती आपल्या आई सोबत राहते. तिची आई सकाळी कामाला जाऊन रात्री घरी येते. २ सप्टेंबर रोजी आरोपीने दारूच्या नशेत तिच्यावर बलात्कार केला आहे.

जेव्हा तिची आई रात्री घरी आली तेव्हा ती मतिमंद महिला पलंगावरून खाली पडून दिसली. तिच्या आई ला बलात्कार झाल्याचे निदर्शनास आले. त्यावरून आई ने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी शिव नगर, बल्लारपूर येथील चंदू बालू भुक्या नावाच्या ५५ वर्षीय नराधम आरोपीला अटक केली आली आहे.

आरोपी विरुध्द ६४ (२) (के), ३३२ (क) बीएनएस २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल केले आहे. दुसऱ्या घटनेत एका अल्पवयीन मुलीवर प्रेम प्रकरणातून लैंगिक शोषण करण्यात आले आहे. आरोपी ने संबंधित मुलीला जबरदस्तीने निर्जन ठिकाणी नेऊन तिच्या सोबत लैंगिक आत्याचार केला.

दरम्यान या प्रकरणात एका पेक्षा अधिक आरोपी असल्याचे बोलल्या जात आहे. मुलीच्या आत्याने पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपी शिवम दिनेश दुपारे (१९) रा. मौलाना आझाद वॉर्ड याला अटक केली असून, आरोपी विरुध्द पॉस्को ४ (१) व बीएनएस २०२३ ६४(१) कलम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

मात्र आपली व आपल्या पालकाची या प्रकरणा मुळे नाहक बदनामी झाल्याचा ताण घेऊन अल्पवयिन पीडित मुलीने गळपास लावून आत्महत्या केल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली असून हे प्रकरण वेगळे वळण घेण्याची शक्यता वार्तविली जात आहे..

या प्रकरण विषयी दिपक साखरे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी पोलीस स्टेशन येथे भेट दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम, पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे करीत आहे.

सदर बलात्कार प्रकरण हे गंभीर स्वरूपाचे असून दोन्ही बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.पीडित अल्पवयीन मुलीची आत्महत्या दुखत आहे…या प्रकरणातील आरोपी अटकेत असून,अल्प वयीन मुलीवर आत्याचार झालेल्या शांती लॉज च्या मालकाला लवकरच अटक करण्यात येणार आहे.
-सुनील गाडे
(पोलीस निरीक्षक,बाल्ल्लारपूर)

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: