गुजरातमधील अहमदाबादच्या सराफा बाजारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची विचित्र घटना समोर आली आहे. येथे काही लोकांनी 1 कोटी 90 लाख रुपये किमतीचे सोने खरेदी केले. तब्बल 2100 ग्रॅम सोने विकत घेतले. त्या मोबदल्यात या गुंडांनी ज्वेलर्सना दिलेले पैसे बनावट होते, ज्यावर बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांचा फोटो छापण्यात आला होता. ही नोट पाहिल्यानंतर ज्वेलर्सना धक्काच बसला. यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
अहमदाबादच्या सीजी रोडवरील बनावट अंगडिया फर्म प्रकरणात अभिनेते अनुपम खेर यांचा फोटो आढळून आला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हे शाखेचे पथक या तिघांचा शोध घेत आहे. सीजी रोडवर असलेल्या लक्ष्मी ज्वेलर्सचे व्यवस्थापक प्रशांत पटेल यांनी सराफा व्यापारी मेहुल ठक्कर यांना पटेल कांतीलाल मदनलाल अंगडिया फर्मला २१०० ग्रॅम सोने देण्यास सांगितले होते.
500 रुपीए नोटों पर गांधी बापू की जगह @AnupamPKher की फोटो !!!
— Kamit Solanki (@KamitSolanki) September 30, 2024
अनुपम खेर की तस्वीर वाले 1.30 करोड़ रुपीए देकर 2100 ग्राम गोल्ड की ठगाई
अहमदाबाद में बुलियन के कारोबारी से ठगी का हैरतंगेज मामला सामने आया pic.twitter.com/47mPhKLK3v
मेहुल ठक्कर याने आपला कर्मचारी भरत जोशी याला अंगडिया फर्मला २१०० ग्रॅम सोने देण्यासाठी पाठवले. भरत जोशी तेथे पोहोचल्यावर त्यांनी मोजणी यंत्र एका माणसाला दिले. दुसऱ्या व्यक्तीने भरत जोशी यांच्याकडून सोने घेतले आणि तिसऱ्या व्यक्तीने मोजणी यंत्रात मोजणी करेपर्यंत बॅगेत 1.30 कोटी रुपये मोजले , पुढील कार्यालयातून 30 लाख रुपये घेऊन या, असे सांगितले.
भरत जोशी यांना नजरेआड करून तिघेही सोने घेऊन तेथून पसार झाले. कर्मचाऱ्याने बॅगेतून 500 रुपयांचे बंडल काढले तेव्हा 500 रुपयांच्या सर्व नोटांवर अनुपम खेर यांचा फोटो छापलेला दिसला. या बनावट नोटांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऐवजी रिझॉल बँक ऑफ इंडिया असे लिहिले होते. पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहेत. या फसवणुकीबाबत स्वत अनुपम खेर यांची एका वृत्तवाहिनीची बातमी पोस्ट केलीय.
लो जी कर लो बात! 😳😳😳
— Anupam Kher (@AnupamPKher) September 29, 2024
पाँच सौ के नोट पर गांधी जी की फ़ोटो की जगह मेरी फ़ोटो???? कुछ भी हो सकता है! 😳😳😳 pic.twitter.com/zZtnzFz34I