Sunday, October 13, 2024
Homeराज्यसंतोष शिरभाते यांना भारतीय हिंदूरत्न पुरस्कार प्राप्त…नवनवीन राणा यांच्याहस्ते करण्यात आले सन्मानित…

संतोष शिरभाते यांना भारतीय हिंदूरत्न पुरस्कार प्राप्त…नवनवीन राणा यांच्याहस्ते करण्यात आले सन्मानित…

या सोहळ्याला खा. अनील बोँडे, आ. रवी राणा यांची उपस्थिती

अकोला जिल्हा तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा कुरुम भाजपचे सर्कल प्रमुख संतोष शिरभाते यांना भारतीय हिंदु रत्न पुरस्कारने अमरावतीच्या माजी खासदार नवनित राणा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .

नेहमी युवा हिंदू वर्गाच्या समस्येला वाचा फोडणारे ,संतोष शिरभाते यांच्या कार्याची दखल घेत तेली समाज संघटनेच्या माध्यमातून द फेअर व्हिजन फाउंडेशनच्या वतीने हा पुरस्कार घोषित करण्यात आला होता . रविवारी २९ सप्टेंबर रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा अमरावती लोकसभेच्या माजी खासदार नवनीत कौर राणा यांच्या हस्ते संतोष शिरभाते यांना प्रदान करण्यात आला.

या पुरस्कार वितरण सोहळ्याला राज्यसभा खासदार अनिल बोंडे , आमदार रवि राणा यांची उपस्थिती लाभली असून याप्रसंगी युवा स्वाभिमान संघटनेचे अमरावती शहराध्यक्ष संजय हिंगासपुरे, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अनीता किशोर तिखीले, भारतीय जनता पार्टी महीला अध्यक्ष ग्रामीण, विजय शिरभाते जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महाराष्ट्र, प्रणिता शिरभाते, डॉ गुल्हाने, युवराज गभणे, मीना श्रीराव, बाळाभाऊ लोहारे, दिपक गीरोडकर तैलिक समीती अध्यक्ष, राजेंद्र बांगाणी ता, उपाध्यक्ष आदीसह गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती. संतोष शिरभाते यांना पुरस्कार मिळाल्याने समाजातील सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: