पातुर – निशांत गवई
चांदुर बिस्वा येथील यशवंत हायस्कूल येथे आमच्या पाल्यांना शिक्षणासाठी शाळेत दाखल केले आहे त्यानुसार येथील हायस्कूल व ज्युनियर महाविद्यालयात दरवर्षी स्नेह संमेलन आयोजित करण्यात येत असते त्याअनुषंगाने येथे शिकत असलेल्या आमच्या पाल्यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्यावर स्नेह संमेलनात परफॉर्मन्स करण्यासाठी संबधित शिक्षिका लांजुळकर यांना शाळेतील विद्यार्थीनी कु. श्रेया जुमडे,कु. संजीवनी धुरंधर परवानगी मागितली परंतु येथील जातीयवादी हीन मानसिकतेच्या शिक्षिका पांडे यांनी संबंधित लांजुळकर शिक्षिका व कु. श्रेया जुमडे ,कु. संजिवनी धुरंधर यांना कोण आंबेडकर?
मी त्याला ओळखत नाही अशा गाण्यांना परवानगी मिळणार नाही असे म्हणून सदर विद्यार्थीनी समोर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला हि बाब जेव्हा घरी पालकांना कळाली तेव्हा पालकांनी शाळेत जाऊन विचारपूस केली त्यावेळी संबंधित शिक्षिका व शालेय प्रशासनाने माफी मागून प्रकरणात सामंजस्य घडवून आणले परंतु दिनांक २०/१२/२०२३ रोजी स्नेह संमेलनात माया भिमान माय सोन्याने भरली ओटी,” भिमाचं गाणं डिजेला वाजतं”हे गाणे सुरू असताना शाळेतील काही विद्यार्थी यांनी जय श्रीराम चे नारे दिले व ओम नंदकिशोर नवथळे या विद्यार्थ्यांने स्टेजवर खुलेआम नंगी तलवार नाचविली व दहशत माजविण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला कोणी अटकाव केला नाही.
त्यावेळी दुसऱ्या बाजूने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नारे दिले परंतु जय श्रीराम चे नारे देणाऱ्यांना काही न बोलता बौद्ध समाजाच्या मुलांना शाळेच्या गेट बाहेर काढून दिले तर शाळेचे अध्यक्ष व्ही. आर. पाटील यांनी स्वप्निल वानखडे या मुलाची कालर पकडून त्याला मार दिला वास्तविक गोंधळ करणाऱ्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षा करणे अपेक्षित होते परंतु तसे न करता हेतूपुरस्सरपणे केवळ बौद्ध समाजाच्या मागासवर्गीय मुलांना शिक्षा करून जातियवादी मानसिकता ठेवून हे कृत्य केले.
या शाळेत नेहमीच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना हीन दर्जाची वागणूक दिली जाते याचा प्रत्यय वेळोवेळी येत आहे याआधी शाळेची प्रवेश प्रकिया सुरू असताना येथील शिक्षक सोंळके यांना एका विध्यार्थ्यांनीने प्रवेशासाठी कोणते कागदपत्रे लागतात असे विचारले असता आतापर्यंत “हेपालायला गेली होती काय”?
असे म्हणून लज्जेस बाधा पोहोचविण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी संबंधित शिक्षकाने माफी मागून यापुढे असे होणार नाही म्हणून आश्वस्त केले होते परंतु सदर शिक्षकाच्या वर्तनात कुठल्याही प्रकारची सुधारणा नाही हा शिक्षक नेहमी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना झोडपून काढण्यासाठी संधी शोधत असतो व नेहमी जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित करीत असतो बऱ्याच वेळा शाळेत मागासवर्गीय मुलांना जातीवरून भेदभाव करणाऱ्या प्रसंगास सामोरे जावे लागते यावेळी सुध्दा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्यावर परफॉर्मन्स केला तर तुमचे अंतर्गत गुण कमी केल्या जातील अशा धमक्या दिल्या जातात यामुळे शालेय विद्यार्थ्यांवर याचे दुष्परिणाम होत आहे.
तरी संबंधित शाळेतील जातियवादी मानसिकता बाळगून असणाऱ्या शिक्षकांवर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल याची प्रशासनाने नोंद घ्यावी. असे शिक्षकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले.