Sunday, December 22, 2024
Homeराज्यप्रदेश कांग्रेस चे प्रवक्ते कपिल ढोके आणि राज्य सरचिटणीस डॉ.अभय पाटील ह्यांची...

प्रदेश कांग्रेस चे प्रवक्ते कपिल ढोके आणि राज्य सरचिटणीस डॉ.अभय पाटील ह्यांची पत्रकार परीषद…

राधाकृष्ण विखे जिल्ह्याच्या इतीहासातील सर्वात अपयशी व निष्क्रीय पालकमंत्री…

पालकमंत्री हरवले आहेत असे कैम्पेन राबवणार…

जिल्ह्याला वाऱ्यावर सोडणाऱ्या पालकमंत्री विखेंनी राजीनामा द्यावा…

अकोला – संतोषकुमार गवई

जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आतापर्यंतचे सर्वात निष्क्रीय व अपयशी पालकमंत्री ठरले आहेत. पालकमंत्री अकोला जिल्ह्याकडे करत असलेले दुर्लक्ष पाहता पुढील दिवसांमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हरवले आहेत अशा पद्धतीचे कैम्पेन आम्ही हाती घेणार आहेत असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे प्रवक्ते कपिल ढोके तथा सरचिटणीस डॉ अभय पाटील ह्यांनी केले. स्थानिक शासकीय विश्रामगृह अकोला येथे आयोजीत पत्रकार परीषदेमध्ये ते बोलत होते.

ह्या पत्रकार परिषदे दरम्यान पुढे बोलतांना ढोके ह्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ह्यांच्या अपयशी कारभाराचा पाढाच वाचला, पालकमंत्र्यांचा जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय बाबीवरती अंकुश असायला पाहीजे परंतु हे सध्याचे पालकमंत्री गत फेब्रुवारी महीन्यापासुन जिल्ह्यात फिरकलेच नाहीत, ह्यांनी कधी अवकाळी पाऊसामुळे नुकसानग्रस्त भागाला भेटी देऊन पाहणी करण्याचे साधे सौजन्य सुद्धा दाखवले नाही तर अनेक प्रशासकीय कामे जिल्ह्यामध्ये प्रलंबीत आहेत ह्याचा आढावा सुद्धा पालकमंत्री विखे ह्यांनी घेतलेला नाही. अत्यंत महत्वाच्या खरीपाच्या नियोजन बैठकीला सुद्धा विखे पाटील उपस्थीत नव्हते तर जिल्ल्ह्या मध्ये मोठ्या प्रमाणात बियाणे व खताचा तुटवडा असतांना पालकमंत्री शेतकरी

अनेक बँकांमध्ये पिककर्जा साठी शेतकरी चकरा मारत आहेत बँका पिक कर्ज देतांना शेतकऱ्यांची अडवणुक करंत आहेत अशा वेळी पालकमंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे असतांना पालकमंत्री जिल्ह्याकडे ढुंकुणही पाहत नाहीत ही गोष्ट शेतकऱ्यांसाठी त्रासदायक आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे म्हणजे २६ फेब्रुवारीच्या रात्री गारपिटीसह झालेल्या अवकाळी ने चार तालुक्यातील ९ हजार १५२ हेक्टरवर शेती पिकांचे नुकसान झाले होते. त्यासाठी २१ कोटी १० लाख ३१ हजार ४८२ रुपये मदतीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने २२ मार्च रोजी शासनाला सादर केला. तर एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ११ हजार ८४३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले.

या करिता ३२ कोटी ९५ लाख ९६ हजार ३८ रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव १४ मे रोजी शासनाकडे सादर केला आहे. त्यामुळे ५४ कोटीचा प्रस्ताव शासनाकडे पडून आहे. पेरणी संपत आली तरी ही शेतकऱ्यांना ही मदत मिळालेली नाही आणी पालकमंत्री विखे ही मदत शेतकऱ्यांना मिळवुन देण्यातही अपयशी ठरले आहेत.

ह्यासह जिल्ह्यामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी हे महत्वाचे पद मे २०२३ पासुन रिक्त आहे. तर जिल्हा पुरवठा अधिकारी हे पद ४ महीन्यांपासुन रिक्त आहे. ह्या कडे लक्ष द्यायला सुद्धा पालकमंत्री विखे पाटील ह्यांना अद्याप वेळ मिळाला नाही. डिपीसी वर अजुनही कार्यकाळ संपत आला तरीही जिल्हा परीषदेमधील ओबिसी सदस्य नियुक्त केलेले नाहीत. जिल्ह्यामध्ये पाणंद रस्ते शेतकऱ्यांच्या मागणी नुसार न झाल्यामुळे यंदा शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होणार आहेत. शेती मोजणीचे हजारो प्रकरणे भूमी अभिलेख विभागाकडे प्रलंबीत आहेत त्यावर सुद्धा कुणाचे नियंत्रण नाही.

अश्या प्रकारच्या अनेक समस्या ह्या जिल्ह्यासमोर आहेत. आणी अशा परीस्थीतीत पालकमंत्र्यांनी प्रशासनावर अंकुश ठेवणे आवश्यक असतांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ह्यांना जिल्ह्याकडे पहायला सुद्धा वेळ नाही म्हणजे पालकमंत्र्यांनीच जिल्ह्याला अनाथ केले अशी परिस्थीती आहे. त्यामुळे पालकमंत्री विखे पाटील ह्यांनी राजिनामा द्यायला पाहीजे अशी मागणी सुद्धा ह्यावेळी कपिल ढोके ह्यांनी केली. यावेळी कांग्रेस सरचिटणीस डॉ अभय पाटील महासचिव विजय देशमुख कांग्रेस नेते अतुल अमानकर, उपस्थिती राहून पत्रकारांशी संवाद साधला.

Santoshkumar Gawai
Santoshkumar Gawaihttp://mahavoicenews.com
मी संतोषकुमार गवई पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या ३२वर्षापासून कार्यरत आहे.सकारात्मक विचार मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतो म्हणून no negative only & only positive news यावरच माझा विश्वास आहे.संपुर्ण देशात सर्वप्रथम कारगील युध्दाचा 'आँखो देखा हाल'मांडता आला. शोध पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या घटना घडामोडी 'महाव्हाईस 'डिजिटल माध्यमातून समाजासमोर मांडणे हे माझ ध्येय आहे... संतोषकुमार गवई अकोला- 9689142973/9860699890
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: