Wednesday, July 24, 2024
spot_img
Homeराज्यसामाजिक क्रांतीचे अग्रदूत छत्रपती शाहू महाराज, सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सामाजिक न्याय...

सामाजिक क्रांतीचे अग्रदूत छत्रपती शाहू महाराज, सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सामाजिक न्याय दिन साजरा…

अकोला – संतोषकुमार गवई

आरक्षणाचा हक्क मिळवून देत सामाजिक न्यायाची शिकवण देत क्रांती करणारे राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांचे जीवन व कार्य प्रत्येकाला प्रेरणा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज चिंचोळकर यांनी व्यक्त केले. ते सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक न्याय दिन कार्यक्रमात बोलत होते यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त एम.डब्ल्यू मून,समाज कल्याण विभागाचे सुसतकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज पुढे बोलताना म्हणाले की शाहू,फुले आंबेडकरांचा विचार आज जागतिक पातळीवर पोहोचला आहे.सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी शाहू राजांनी केलेले प्रयत्न सामाजिक क्रांतीचा हुंकार होता. कार्यक्रमात अमलीपदार्थ विरोधी दिवसानिम्मित व्यसनमुक्ती शपथ घेण्यात आली. यावेळी श्रीमती पंचफुलाबाई पाटील समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी, बार्टीचे प्रकल्प अधिकारी समतादूत यांच्यासह सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Santoshkumar Gawai
Santoshkumar Gawaihttp://mahavoicenews.com
मी संतोषकुमार गवई पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या ३२वर्षापासून कार्यरत आहे.सकारात्मक विचार मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतो म्हणून no negative only & only positive news यावरच माझा विश्वास आहे.संपुर्ण देशात सर्वप्रथम कारगील युध्दाचा 'आँखो देखा हाल'मांडता आला. शोध पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या घटना घडामोडी 'महाव्हाईस 'डिजिटल माध्यमातून समाजासमोर मांडणे हे माझ ध्येय आहे... संतोषकुमार गवई अकोला- 9689142973/9860699890
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: