Sunday, September 8, 2024
spot_img
Homeराज्यभिमशाहिर प्रदीप कडबे यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन...

भिमशाहिर प्रदीप कडबे यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन…

रामटेक – राजु कापसे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती शितलवाडी द्वारा संचालित कल्याण मित्र बुद्ध विहार शितलवाडी येथे १४ एप्रील रविवारला महामानव प्रज्ञा सूर्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी भिमशाहीर प्रदीप कडबे यांनी गायनातून समाज प्रबोधन केले.

दरम्यान भीमसेन प्रदीप कडवे यांनी महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच त्यांनी भीम गीत गायनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विज्ञानवादी विचार मांडून समाज प्रबोधन केले तेव्हा त्यांचा येथे जाहीर सत्कारही करण्यात आला.

कार्यक्रमाला डॉक्टर वाघमारे, साक्षोधन कडबे गुरुजी , दीपराज भोवते , शोभाताई रमाताई गजबे , वैशाली वाघमारे , बबीता चोखांद्रे , अर्चना कडबे , निधी कडवे उत्कर्ष कडवे , नेहा चौरे , रमाताई राऊत , गायकवाड ताई ,दिपाली चव्हाण , वर्षा शेंडे , ज्योत्स्ना मेश्राम , अर्चना मोटघरे , युवराज अडकणे , शाहीर अरुण मेश्राम , भीमसेन प्रदीप कडबे , रमेश रामटेके इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: