Sunday, December 8, 2024
Homeराज्यरामटेक | अन् सत्ताविस वर्षांनी भरला चाळीसीपार विद्यार्थ्यांचा वर्ग...

रामटेक | अन् सत्ताविस वर्षांनी भरला चाळीसीपार विद्यार्थ्यांचा वर्ग…

  • दिला जुन्या आठवणींना उजाळा- गच्च मिठी मारून घेतली एकमेकांची भेट
  • श्रीराम विद्यालयातील ‘ बॅच ऑफ १९९७ ‘ चा स्नेहमिलन सोहळा
  • जिवन प्रवास सांगतांना कित्येकांच्या डोळ्यात अश्रु

रामटेक – राजु कापसे

रामटेक शहरातील ‘ श्रीराम विद्यालय ‘ येथील सन १९९७ च्या बॅच चा नुकताच दि. १३ एप्रील ला तब्बल २७ वर्षानंतर त्याच शाळेत वर्ग भरला. चेहऱ्यात व शरीराच्या आकारमानात आमुलाग्र बदल घडून आला असतांना व एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदाच भेटल्यावर प्रत्येकानेच प्रत्येकाला गच्च मिठी मारून आनंद साजरा केला. हा विलक्षण क्षण खरंच टिपण्यासारखा होता हे येथे विशेष.

शहरातील श्रीराम विद्यालय, रामटेक येथे सन १९९७ ला अ तथा ब तुकडीमध्ये दहावितील पन्नासीच्या जवळपास विद्यार्थी शिक्षण घेत होते. दहाविनंतर जणु सर्वच एकमेकांपासून पुढील शिक्षण तथा जिवन प्रवासाच्या मार्गाने निघुन गेले होते.

पुढे कुणी शासकिय सेवेत तर कुणी खाजगी कंपनीमध्ये उच्च पदावर तर कुणी खाजगी कामात तर कुणी स्वतःचे छोटे मोठे उद्योग थाटून बसले व आपल्या सांसारीक जिवनात व्यस्त झालेले होते. कुणाचाच थांगपत्ता कुणाला नव्हता. अशातच गेल्या एक दोन वर्षात कडीला कडी जुळल्याप्रमाणे एक एकाचा भ्रमणध्वनी क्रमांकाचा शोध लावत एक व्हॉट्स ॲप गृप तयार केला होता व त्याच माध्यमातुन हे सर्व विद्यार्थी एकमेकांच्या संपर्कात होते.

तेव्हा एक दोन महिन्यांपुर्वी अलगदच काही विद्यार्थ्यांच्या मनात स्नेह मिलनाचा कार्यक्रम करण्याचा विचार आला. मात्र ही तेवढी सोपी व सहजपणे घडुन येणारी बाब नव्हती. कारण सर्वच आपल्या काम धंद्यात तथा संसाराचा गाडा हाकण्यात व्यस्त होते. काही विद्यार्थी तर दुरच्या भागात, कुणी परराज्यात जावुन वसले होते. एकुणच सर्वांना एकत्र येणे तेवढे सहज व सोपे नव्हते. मात्र काही मित्रांच्या पुढाकाराने दि. १३ एप्रील ला हा योग जुळून आला.

दरम्यान सुरुवातीला ज्या शाळेत शिक्षण पार पडले अशा त्या श्रीराम विद्यालयात सर्व मित्र एकत्र आले. येथे मित्रांचा २७ वर्षानंतर एकमेकांना भेटण्याचा तो विलक्षण क्षण पहाण्यासारखा होता. यानंतर जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. शाळेतीलच एका वर्गात डेक्स बेंचवर बसुन या चाळीसीपार विद्यार्थ्यांचा पुन्हा एकदा वर्ग भरला. यानंतर शाळेतून निघाल्यावर काही तत्कालीन शिक्षक – शिक्षीकेचा शोध घेण्यात आला.

त्यावेळी असलेले मुख्याध्यापक तोतडे सर, शिक्षक रायपुरकर सर, देवतारे, डडोरे सर तथा शिक्षीका काशीकर मॅडम यांच्या घरी जावुन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला तसेच परीचय देण्यात आला. यानंतर खिंडसी जलाशयाजवळ फोटोशेशन करण्यात आले. यानंतर एका नामांकीत हॉटेल मध्ये स्नेहमिलनाचा ( गेट टुगेदर ) कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात प्रत्येकालाच आपला आतापर्यंतचा ‘ जिवन प्रवास ‘ व्यक्त करण्याची संधी देण्यात आली होती.

त्यात किती अडचनी आणि अडथळ्यांना सामना करून मी या स्टेज पर्यंत पोहोचलो असे सांगतांना अनेकांचे डोळे भरून आले. तसेच एवढ्या वर्षानंतर बिछडलेल्या मित्रांना पुन्हा भेटून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. यावेळी उपस्थितांमध्ये चेतन चव्हाण, दिपक भोले, बबलु ठाकुर, मणिष जुननकर, पंकज बावनकर, चंद्रशेखर अंबागडे, सुधीर चौधरी, शाम सातपुते, क्रिष्णा कुल्लरकर, मनोज लांजेवार, नितीन गेडाम, राहुल बागडे, आशिष विश्वकर्मा, संजय मोहुर्ले, दिनेश बर्वे, अनिल कुर्वे, अभिजीत सत्रमवार, चंद्रकांत बुधे, अभिजीत भुजाडे, कुणाल कविश्वर, आशिष निनावे, संदीप ठाकुर, किरण सहारे, धिरज बागडे, गिरीष ढोमणे, विवेक खंडाळे तथा प्रविण दांडेकर आदी. उपस्थीत होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: