अकोला – संतोषकुमार गवई
जिल्ह्यात एक जुलै २०२४ या अर्हता दिनांकावरील मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून, या दिनांकास वयाची 18 वर्षे पूर्ण करणा-या सर्व नागरिकांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करावी, कोणताही पात्र व्यक्ती मतदार यादीमध्ये नांव समाविष्ट करण्यापासून वंचित राहू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे. निवडणूक आयोगाकडून दिनांक एक जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यकम जाहीर करण्यात आला आहे.
त्यात एकत्रित मतदार याद्यांची प्रारुप प्रसिध्दी दिनांक 25 जुलै 2024 रोजी जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसुल) जिल्हाधिकारी कार्यालय अकोला व सर्व उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांची कार्यालये, सर्व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांची कार्यालये येथे करण्यात येणार आहे. तसेच सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे त्यांचेशी संबंधित मतदार यादी भागाची प्रारुप मतदार यादी उपलब्ध असणार आहे. तसेच दि. 25 जुलै 2024 ते 9 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये दावे व हरकती दाखल करता येतील.
प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर सदर यादीची तपासणी करुन सर्व मतदारांनी आपली नांवे मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्याबाबत व त्यातील तपशील योग्य असल्याबाबत खात्री करावी. दि. 1 जुलै 2024 रोजी वा त्यापुर्वी वयाची 18 वर्षे पुर्ण होणा-या तसेच ज्या मतदारांची नांवे मतदार यादीमध्ये समाविष्ट नाहीत अशा पात्र व्यक्तींनी आपले नांव नोंदविण्यासाठी संबंधीत मतदार नोंदणी अधिकारी/सहायक मतदार नोंदणी अधिकारी/मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे आवश्यक पुराव्यांसह विहीत नमुना 6 सादर करावा अथवा मा.भारत निवडणूक आयोगाकडून विकसित करण्यात आलेल्या voters.eci.gov.in या संकेत स्थळाचा / voter helpline या App चा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वापर करावा. विहित नमुने जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेकडे उपलब्ध करुन दिले आहेत.
त्याचप्रमाणे मयत किंवा कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदारांची नांवे वगळणी करणेकरीता विहीत नमुना 7 आवश्यक कागदपत्रांसह भरुन द्यावा, मतदारांच्या मतदार यादीमधील तपशीलामध्ये दुरुस्ती करणे, पत्ता बदलणे, नवीन मतदार छायाचित्र ओळखपत्र मिळविणे इत्यादी साठी आवश्यक पुराव्यांसह विहीत नमुना 8 मध्ये अर्ज संबंधीत मतदार नोंदणी अधिकारी / सहा. मतदार नोंदणी अधिकारी/ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे सादर करता येईल.
ज्या मतदारांना त्यांच्या मतदार यादीमधील नोंदीशी त्यांचा आधार क्रमांक स्वयंस्फूर्तीने संलग्न करावायाचा आहे, त्यांनी विहित नमुना क्र. 6 किंवा 8 भरुन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अथवा तहसिलदार तथा सहा. मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. *पुनरिक्षण पूर्व उपक्रम*1मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेव्दारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी दिनांक 25/06/2024 (मंगळवार)ते दिनांक 24/07/2024 (बुधवार) दरम्यान करण्यात येईल.
त्यात मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण मतदार यादी / मतदार ओळखपत्रातील त्रुटी दुर करणे व आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करुन मतदार यादीत सुधारणा करणे, तसेच अस्पष्ट/अचुक छायाचित्र बदलुन त्याऐवजी संबंधित मतदाराकडून योग्य दर्जाची छायाचित्र प्राप्त करुन मतदार यादीत सुधारणा करणेविभाग/भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करुन मतदान केंद्रांच्या सीमांचे पुनर्रचना तयार करुन मतदान केंद्रांच्या यादीस मान्यता घेणे, कंट्रोल टेबल अद्यावत करणे, नमुना 1 ते 8 तयार करणे, 01/07/2024 या अर्हता दिनांकावर आधारीत पुरवणी व एकत्रीत प्रारुप यादी तयार करणे आदी कामे*पुनरिक्षण कार्यक्रम*2एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणेदिनांक 25/07/2024 (गुरुवार)3दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधीदिनांक 25/07/2024 (गुरुवार)ते 09/08/2024 (शुक्रवार)4विशेष मोहिमांचा कालावधीपुनरिक्षण कार्यक्रम कालावधीतील शनिवार व रविवार (मा.मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य निश्चित करुन देतील त्याप्रमाणे) 5दावे व हरकती निकाली काढणेअंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी मागणेडाटाबेस अद्यावत करणे व पुरवणी याद्यांची छपाई करणेदिनांक 19/08/2024 (सोमवार) पर्यंत6मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणेदिनांक 20/08/2024 (मंगळवार) मतदारांच्या घरोघरी भेटीची मोहिमः
सदर कार्यक्रमानुसार दिनांक 25/06/2024 ते 24/07/2024 या कालावधीमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन मतदारांच्या तपशिलाची पडताळणी करणार आहेत. त्यावेळी मयत/दुबार/कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदारांची नांवे वगळणी तसेच नव्याने नांव नोंदणी करता येणार आहे. मतदार यादीमधील तपशिलामध्ये काही बदल करावयाचा असल्यास तसेच मतदार यादीतील छायाचित्र अस्पष्ट/चुकीचे असल्यास त्यामध्ये बदल करता येणार आहे. त्याचप्रमाणे जे दिव्यांग मतदार त्यांची माहिती देण्यास सहमत असतील त्यांची माहिती विहित नमुना 8 मध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेमार्फत भरुन घेण्यात येणार आहे.मतदान केंद्र सुसूत्रीकरणः
सदर कार्यक्रमांतर्गत ज्या मतदान केंद्रांवर 1500 पेक्षा अधिक मतदार असतील अशा तसेच ज्या मतदान केंद्रांच्या इमारती नादुरुस्त/शिकस्त अथवा ज्या मतदान केंद्रांवर मुलभूत सुविधा उपलब्ध नसतील अशा मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार नवीन मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहेत.