Monday, July 22, 2024
spot_img
Homeगुन्हेगारीनागपूर | पुन्हा खिंडसी जलाशयात मिळाला ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह...

नागपूर | पुन्हा खिंडसी जलाशयात मिळाला ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह…

रामटेक – राजु कापसे

नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खिंडसी जलाशयात रविवारला पहाटेच्या सुमारास जलाशयाच्या काठावर ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. त्याच्याजवळ सापडलेल्या आधार कार्ड तपासल्यानंतर मृतकाचे नाव संजय बाबूलाल टेंभरे रा.कारंजा जि.गोंदिया असल्याचे समोर आले. जलाशयात मृतदेह असल्याची माहिती मिळताच रामटेक पोलीस व वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन टीम घटनास्थळी पोहोचले व काठावर पडलेला मृतदेह बाहेर काढले.

मयत हा नंबर प्लेट नसलेल्या ग्लॅमर नावाच्या दुचाकीने खिंडसी परिसरात आला व दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करून जलाशयात उडी घेतली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. मृतदेह उपजिल्हा रुग्णालय रामटेकच्या विच्छेदन केंद्रात आणण्यात आले असून याप्रकरणी रामटेक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रामटेक पोलीस अधिक तपास करत आहेत.

गेल्या ३ महिन्यात खिंडसी जलाशयात आत्महत्या करणाऱ्यांची संख्या ५ वर पोहचली असून,आत्महत्या करण्यासाठी खिंडसी जलाशयाकडेच लोकांचे पाय का वळतात असा प्रश्न सद्या उपस्थित होत आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: