Tuesday, January 21, 2025
Homeराज्यशिव उद्योग संघटनेतर्फे महिला रोजगार मेळावा संपन्न...

शिव उद्योग संघटनेतर्फे महिला रोजगार मेळावा संपन्न…

मुंबई – गणेश तळेकर

शिव उद्योग संघटना आणि राणी ताराबाई महिला बचतगट, ललिता महिला बचत गट यांच्या सहयोगाने शशांक कोदे (शिव उद्योग संघटना दक्षिण मुंबई संपर्कप्रमुख, वांद्रे पश्चिम विधानसभा समन्वयक) यांनी नुकतेच नॅशनल लायब्ररी, बांद्रा पश्चिम येथे महिला मेळाव्याचे आयोजन केले. सदर महिला मेळाव्यासाठी विभाग क्रमांक सातचे विभाग प्रमुख कुणालभाई सरमळकर यांनी बहुमूल्य योगदान दिले. दरम्यान, प्रमुख अतिथी शिवसेना उपनेत्या कलाताई शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत सिंहासनाधीश छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार चढविण्यात आला.

सदर महिला रोजगार मेळाव्यात शिव उद्योग संघटनेचे अध्यक्ष दीपक काळीद, सरचिटणीस प्रकाश ओहळे तसेच विविध समिती प्रमुख हजर होते. शशांक कोदे यांनी मेळाव्याची प्रस्तावना करून कार्यक्रमाला सुरूवात केली. 

कृषी उत्पादन समिती प्रमुख गोकुळ लगड यांनी कृषी व्यवसायातील महिलांना असणाऱ्या संधी याविषयी मार्गदर्शन केले. भोजन समिती प्रमुख संतोष आडविलकर यांनी या क्षेत्राचा आवाका किती मोठा आहे हे सांगत शिव उद्योग संघटना १५ ऑगस्ट रोजी दोन सेन्ट्रल किचनचे उद्घाटन करत असून विभागातील महिलांना या व्यवसायात येण्याचे आवाहन केले. प्रॉपर्टी समिती प्रमुख भालचंद्र डफळ यांनी ऑनलाइन माध्यमातून प्रॉपर्टीचे काम कसे करावे याबद्दल माहिती दिली.

हेल्थ आणि फार्मा समितीच्या रीमा काकडे यांनी कांस्य थाळी हेल्थ सेंटर विषयी माहिती देतानाच महिलांमध्ये फिटनेसचे महत्त्व सांगत त्यांच्याकडून व्यायाम देखील करून घेत सभागृहामध्ये जोश निर्माण केला. इव्हेंट समिती प्रमुख गुरुदत्त वाकदेकर यांनी शिव उद्योग शिवाई मंच, इव्हेंट समितीच्या माध्यमातून मनोरंजना सोबतच व्यवसाय कसा करता येईल याची माहिती दिली.  

अध्यक्षीय भाषणात दीपक काळीज यांनी महिलांना रोजगार व व्यवसायासाठी तुम्ही एक पाऊल पुढे टाका शिव उद्योग संघटना प्रत्येक पावलावर तुम्हांला साथ करेल, हे सांगताना सर्व समित्यांचा धांडोळा मांडला. सोबतच शिव उद्योग संघटना एक बहुउद्देशीय इलेक्ट्रिक व्हेईकल व्यवसायासाठी उपलब्ध करून देत आहे त्याविषयी माहिती दिली. मेळाव्याला आंतरराष्ट्रीय व्यापार समिती प्रमुख सुधा साठ्ये आणि योग समिती प्रमुख उमेश गोरुले हे उपस्थित होते. सर्व उपस्थितांना अनंत पब्लिक एंटरप्राइजेसच्या नितीन सुखदरे यांनी स्वतःचे उत्पादन असलेल्या अगरबत्तीचे मोफत सॅम्पल दिल्यामुळे सभागृहातील वातावरण सुगंधित झाले. 

प्रमुख अतिथी शिवसेना उपनेत्या कलाताई शिंदे यांनी सर्व माता भगिनीना व्यवसाय करण्याचे आवाहन करित मुख्यनेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहीण योजनेची माहिती देत या सरकारने महाराष्ट्रातील जनतेसाठी केलेल्या आणि करत असलेल्या कार्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानत जास्तीतजास्त योजनांचा लाभ घेण्यासंबंधी महिलांना मार्गदर्शन केले. 

सदर कार्यक्रमाला कार्ल सिक्वेरा (वांद्रे पश्चिम विधानसभा प्रमुख) राजेंद्र अंकुश नाईक (वांद्रे पश्चिम विधानसभा समन्वयक), राणी ताराबाई महिला बचतगट तसेच ललिता महिला बचत गट यांचे विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमास शोभाताई पावले (वांद्रे पश्चिम महिला विधानसभा प्रमुख), माला राणे (महिला शाखा प्रमुख ९७),  निर्मला पाटील (महिला शाखा प्रमुख ९९), कावेरी कोदे (महिला शाखाप्रमुख १००), ललिता स्वामी (महिला शाखाप्रमुख १०१), भीम अर्जुन घाडगे (शाखाप्रमुख ९९),  योगेश पावसकर (शाखाप्रमुख १०१) यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: