सांगली – ज्योती मोरे.
“शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जडणघडण मुंबईच्या कामगार चळवळीत झाली. गोरगरीब जनतेची होणारी पिळवणूक पाहून त्यांच्यातील कलाकार जागा झाला. कामगारांची हलाखीची स्थिती पाहून त्यावर त्यांनी अनेक कवने, पोवाडे लिहले. आणि प्रचंड सभांमधून पोवाडे सादर करून कामगारांच्या व्यथांना वाचा फोडली.
आपल्या शाहीरकलेचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत योग्य वापर करून हि चळवळ सर्व सामान्य जनते पर्यंत नेली. अशा शाहीर अण्णाभाऊंचा संयुक्त महाराष्ट्र कायमचा ऋणी राहील.” असे विचार नगरसेवक श्री. संजय कुलकर्णी यांनी मांडले. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या संपर्क कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना त्यांनी आपले विचार मांडले.
याप्रसंगी भाजपचे राष्ट्रीय परिषदेचे सदस्य प्रकाशतात्या बिरजे, संघटन सरचिटणीस दीपक माने, रवींद्र सदामते, गणपत साळुंखे, गौस पठाण, राजेंद्र पवार, अभिजित मिराजदार, सतीश फोंडे, आबा जाधव, इत्यादी मान्यवर उपस्थित होते..