Tuesday, December 24, 2024
Homeराज्यशाहीर कलाकारांना मिळणार रुपये ५००० /- मानधन...

शाहीर कलाकारांना मिळणार रुपये ५००० /- मानधन…

शाहीर राजेंद्र बावनकुळे यांच्या प्रयत्नाला भरघोस यश…

महाराष्ट्र शासनाचे शाहीर कलाकारांनी मानले आभार…

रामटेक – राजु कापसे

मागील कित्येक वर्षापासून भारतीय कलाकार शाहीर मंडळ कलाकारांच्या मागणीसाठी सरकारला निवेदने मोर्चा काढणे, साखळी उपोषण करून सतत पाठपुरावा करणे सुरू होते. मोर्चाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने १६ मार्च २०२४ रोजी सरसकट ५०००/- रुपये मानधन वाढ केली.

त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे व सांस्कृतिक कार्य संचालक मुंबई यांचे जाहीर आभार शाहीर कलाकारांनी मानले. वृद्ध कलाकारांना सध्या परिस्थिती २२५०/- रुपये मानधन मिळत असल्याने या तुटपुंजे मानधनात प्रपंच चालत नव्हते. सातत्याने कलाकारांकडून मानधन वाढ करण्यासाठी मागणी होत होती.

परंतु कोणीही पुढाकार घेत नव्हते अखेर भारतीय कलाकार शाहीर मंडळ कामठी संस्थेचे अध्यक्ष शाहीर राजेंद्र भिमराव बावनकुळे आणि सहकारी यांनी पाठपुरावा केल्याने वयोवृद्ध कलाकारांना आता सरसकट मासिक ५०००/- रुपये मानधन मिळणार आहे.

मागील हिवाळी अधिवेशनात २० डिसेंबर २०२२ आणि १३ डिसेंबर २०२३ रोजी भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडिया च्या वतीने भव्य शाहीर कलाकार मोर्चा हिवाळी अधिवेशनात मागण्या मान्य करण्यासाठी काढण्यात आला होता. मागण्याचे निवेदन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देण्यात आले होते.

यानंतर लगेच १८ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२३ पर्यंत साखळी उपोषण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक यांना निवेदन देण्यात आले होते. या मोर्चाचे नेतृत्व शाहीर राजेंद्र भिमराव बावनकुळे, डॉ.संजय बजाज, कवी ज्ञानेश्वर वांढरे, शाहीर भगवान लांजेवार, योगिता नंदनवार, सुभाष गोरे सोलापूर, शिवाजी शिंदे नगर, उत्तम गायकर नाशिक, गजेंद्र गवई बुलढाणा, शाहीर पांडे अकोला, बाळासाहेब मालुस्कर पुणे, आणि सहकारी यांनी केले.

त्या मोर्चाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने १६ मार्च २०२४ ला सरसकट ५०००/- रुपये मानधन वाढ केली. त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे व सांस्कृतिक कार्य संचालक मुंबई यांचे जाहीर आभार शाहीर कलाकारांनी मानले. गेल्या कित्येक वर्षापासून भारतीय कलाकार शाहीर मंडळ कलाकारांच्या मागणीसाठी सरकारला निवेदने, मोर्चा काढणे, साखळी उपोषण करून सतत पाठपुरावा करणे सुरू होते.

आज त्या संघर्षाला भरघोश यश मिळाल्याने शाहीर कलाकार यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागले आहे. १५ नोव्हेंबर २०२३ कामठी तहसीलदार अक्षय पोयाम मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री यांना निवेदन देण्यात आले होते, ३१ जानेवारी २०२४ रोजी सांस्कृतिक कार्य संचालनालय संचालक विभीषण चौरे, सहसंचालक श्रीराम पांडे यांना मुंबई येथे जाऊन निवेदन देण्यात आले होते.

१ फेब्रुवारी २४ ला मंत्रालय मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयामध्ये जाऊन शाहीर कलाकार मागण्याची निवेदन देण्यात आले. तसेच व्यक्तीशा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबई देवगिरी बंगल्यावर जाऊन निवेदन देण्यात आले. रामटेक दौऱ्यावर ११ फेब्रुवारी २०२४ ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते.

प्रसंगी व्यक्तीशा शाहीर राजेंद्र बावनकुळे, शाहीर भगवान लांजेवार,‌ चिरकूट पुंडेकर, गजानन वडे आणि मंडळींनी निवेदन दिले होते.‌ महाराष्ट्रतील एकमेव संस्थांची ज्यांची स्थापना १९५५ ला झाली आहे. भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडिया हीच संस्था आहे जे कित्येक वर्षांपासून शाहीर कलाकारानसाठी मोर्चा काढणे, साखळी उपोषण करणे, संबंधित मंत्री, अधिकारी यांना निवेदन देऊन कलाकार यांना न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी सतत संघर्ष करीत आहे.

यापूर्वी स्व.भिमराव बावनकुळे गुरुजी आणि सहकारी डॉ संजय बजाज, कवी ज्ञानेश्वर वांढरे, राजेंद्र बावनकुळे यांच्या सहकार्याने महाराष्ट्र मध्ये प्रत्येक जिल्ह्यात मानधन कार्यालय सुरू करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे ,आमदार बच्चू कडू ,खंडूराज गायकवाड ,राधेश्याम हटवार, विजय हटवार यांना सुद्धा शाहीर कलाकार मागण्याचे निवेदन देण्यात आले होते.

त्यांच्या पाठपुरावा सतत सुरू असल्याने कार्याला यश आले. राहिलेल्या शाहीर कलाकारांचा मागण्यासाठी लढा सुरू राहील, महाराष्ट्रातील प्रत्येक स्तरावर खूप खूप आभार व अभिनंदन म्हणून भावना व्यक्त करीत आहेत.तसेच पत्रकार यांचे मोलाचे सहकार्य आहे, यावेळी शाहीर अंबादास नागदेवे भंडारा, शाहीर सुबोध कान्हेकर, शा मोरेश्वर मेश्राम ,नरहरी वासनिक, ब्रह्मा नवघरे, अरुण मेश्राम, ललकार चौहान,आर्यन नागदेवे, विनायक नागमोते, नरेंद्र दंडारे, सुरमा बारसागडे,

शंकर येवले, राजेंद्र येस्कर, पुरुषोत्तम खांडेकर, ज्ञानेश्वर मेश्राम, उर्मिला चौधरी, निशान सुखदेवे,‌ अशोक घुमरे, जयाताई बोरकर, सुभाष देशमुख, प्रदीप पाटील कुरेकर, शिशुपाल अतकरे ,विक्रम वांढरे, विमल शिवारे, अरुणा बावनकुळे, मोरेश्वर बळवाईक, सुनील सरोदे, नाना ठवकर प्रेमलाल भोयर, पंढरी जंजाळ, सुनील बोंद्रे, महादेव पारसे, भूपेश बावनकुळे, गिरीधर बावणे आणि असंख्ये शाहीर कलाकार यांनी शासनाचे अभिनंदन केले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: