Tuesday, October 15, 2024
Homeगुन्हेगारीनांदेड जिल्ह्यात मोटार सायकल चोरी करणारी टोळी गजाआड ! ६१ मोटार सायकल,...

नांदेड जिल्ह्यात मोटार सायकल चोरी करणारी टोळी गजाआड ! ६१ मोटार सायकल, सहा आरोपी सह २१,४७,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त-५१ गुन्हे उघड…

स्थानिक गुन्हे शाखा नांदेडची कारवाई

नांदेड – महेंद्र गायकवाड

जिल्हयातील मोटार सायकल चोरीचे गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी वेगवेगळी पथके तयार करुन मोटार सायकल चोरीचे गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे चालु केले होते.

त्यानुसार दिनांक 18 मार्च रोजी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा उदय खंडेराय यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, किनवट येथील काही इसमाकडे चोरीचे मोटार सायकल आहेत अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने त्यांनी स्थागुशाचे पोउपनि आनंद बिचेवार व सचिन सोनवणे यांचे दोन पथकांना किनवट येथे रवाना केले.

स्थागुशाचे पथकांनी मिळालेल्या माहीतीचे ठिकाणी जावुन गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहिती प्रमाणे सहा संशईत इसम नामे 1) बालाजी आभिमान माने वय (27 )वर्षे व्यवसाय मजुरी रा. भावेश्वरनगर चौफाळा, नांदेड ता. जि. नांदेड ह. मु. सिध्दार्थनगर गोकुंदा, ता. किनवट जि. नांदेड 2) दिपक सुरेश कोकुर्ले वय (23) वर्ष व्यवसाय बेकार रा. शनिवारपेठ, किनवट 3) विकास शेषेराव शिंदे वय (23) वर्ष व्यवसाय बेकार रा. प्रधान सांगवी ता. किनवट जि नांदेड

4) रमेश श्यामराव कयापाक वय (38 )वर्ष व्यवसाय बेकार रा. तरोडा खुर्द बेलानगर, नांदेड ह. मु. कोठारी ता. किनवट 5) राजु दादाराव भगत वय (24) वर्ष व्यवसाय बेकार रा. कोठारी ता. किनवट 6) शफी फकरोद्यीन सय्यद वय (23 )वर्ष व्यवसाय बेकार रा. कोठारी ता किनवट यांना यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्यांनी मोटार सायकल चोरी केल्याचे सांगीतले.

त्यांचेकडुन 61 मोटार सायकल किंमती 21,47,000/- रुपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आले असुन त्यामध्ये नांदेड जिल्हयातील एकुण 51 मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड करण्यात आले आहेत. उर्वरीत 10 मोटार सायकल चोरीचे गुन्हयाबाबत शहानिशा करुन संबंधीत पोलीस ठाणेस देण्यात येत आहे.

नमुद आरोपीकडुन इतर आरोपी व गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. नमुद आरोपीतांकडुन चोरीची मोटार सायकल खरेदी करणारे इसमाविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्यात आली आहे. ताब्यातील आरोपीतांना पुढील तपासकामी संबंधीत पोलीस ठाण्यास देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक. स्थागूशा नांदेड, पोउपनि/आनंद बिचेवार, सचिन सोनवणे, आशिष बोराटे, दत्तात्रय काळे, गंगाप्रसाद दळवी, पोलीस अमंलदार माधव केंद्रे,

गुंडेराव करले, सुरेश घुगे, संजिव जिंकलवाड, देवा चव्हाण, बालाजी यादगीरवाड, गजानन बयनवाड, मोतीराम पवार, तानाजी येळगे, मारोती मोरे, महेश बडगु, रणधीर राजबन्सी, धम्मा जाधव, हेमंत बिचकेवार, गंगाधर घुगे, हनुमानसिंह ठाकुर स्थागुशा नांदेड व सायबर सेल चे राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे, रेश्मा पठाण, व्यंकटेश सांगळे, जवलासिंग बावरी यांचे पथकांनी पार पाडली आहे.

पोलीस अधीक्षक नांदेड यांनी जिल्हयातील जनतेस आपले मोटार सायकल पार्कीग करताना आवश्यक ती काळजी घेण्याबाबत व कमी किंमतीत कोणी चोरीची मोटार सायकल देत असल्यास पोलीसांना संपर्क करण्याबाबत आवाहन  केले आहे.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: