लातूर (प्रतिनिधी)
लातूर येथील वासनगाव शिवारातील शेतात राहत्या घरी दत्तात्रय पाटील यांनी पूजा स्थापन केली होती, पूजा होऊन काही वेळा नंतर पाटील याना घरात साप निदर्शानास आला असता त्यांनी व घरातील काही सदस्यांनी सापाला पळवून लावण्याचा प्रत्यन केला, पण तो व्यर्थ ठरला घराच्या बाजूस गोठ्यातील अडचणीच्या भागात साप शिरला.
साप मोठा असून तो त्याला पळवून लावण्यास अपयश आले असता गोठ्यात जनावरे रात्री बांधावी लागतात, साप जनावरांना चावेल या भितीपोटी त्यांनी तात्काळ लातूरचे सर्पमित्र सोहेल शेख यांना संपर्क साधला व त्यांना सर्व हिकीकत सांगितली, सर्पमित्र सोहेल शेख हे तात्काळ वासनगाव शिवारात आले, सोबत चारुदत्त पंपाड व सोहेल शेख यांनी भर पावसात शोधाशोध केली असता त्यांना तब्बल दोन तासानंतर साप आढळून आला.
सर्पमित्र सोहेल शेख यांना तो नाग जातीचा साप आहे असे समजले असता त्यांनी तात्काळ नाग जातीच्या सापाला हानी न होऊ देता पकडले, सोहेल शेख यांनी दाखवलेल्या तत्परते मुळे व आज विशेष नागपंचमी असल्यामुळे नागाला जीवनदान मिळवून दिले. नागाला दूध पाजविणे, जिवंत नागाला हळदी – कुंकू लावण्याचा प्रयत्न करणे, जिवंत नागाची पूजा करणे अश्या अनेक सापांनबद्दलच्या अंधश्रद्धा व अफवांना प्राधान्य देऊ नये व साप आढळ्यास त्याला हानी न पोहचवता त्यावर लक्ष्य ठेवून तात्काळ सर्पमित्रांना फोन करावा असे अशी माहिती सर्पमित्र सोहेल शेख यांनी दिली.