Sunday, December 22, 2024
Homeराज्यपातुर च्या संत लीला माता आणि संत तीमांडे महाराज महाराजांचे कार्य उल्लेखनीय...

पातुर च्या संत लीला माता आणि संत तीमांडे महाराज महाराजांचे कार्य उल्लेखनीय – राष्ट्रीय कीर्तनकार संदीप पाल महाराज…

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवाश्रमाच्या माध्यमातून प्रचारांचे कार्य

पातुर – निशांत गवई

पातुर येथील स्वर्गीय संत लीलामाता आणि संत तीमांडे महाराज यांचे कार्य उल्लेखनीय असून त्यांचा समाजाप्रती त्याग शब्दांमध्ये वर्णन केल्या जाऊ शकत नाही असे मत सप्त खंजिरी वादक तथा राष्ट्रीय कीर्तनकार सत्यपाल महाराजांचे शिष्य संदीप पाल महाराज यांनी पातुर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा आश्रमामध्ये संत तीमांडे महाराज यांच्या अमृत महोत्सवा निमित्त कीर्तनाप्रसंगी मत व्यक्त केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवाश्रमाची निर्मिती करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कार्य आणि साहित्याचा प्रचार गेल्या 40 ते 50 वर्षापासून करीत असून सामुदायिक प्रार्थना सामुदायिक ध्यान दररोज नियमितपणे करून येथे समाज प्रबोधनासाठी 16 महिला पुरुष कीर्तनकाराची मांदियाळी निर्माण केली तीमांडे महाराज यांचा वाढदिवस तथा अमृत महोत्सव हा श्रमदानं दिन म्हणून साजरा केला जातो हा समाजातील अध्यात्म क्षेत्रात वावरणाऱ्या लोकांनी आदर्श घ्यावा असे आवाहन संदीप पाल महाराज यांनी उपस्थित गुरुदेव प्रेमी यांना केले.

दिनांक 20 जानेवारी 2024 ला तीमांडे महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रसंत सेवा आश्रमातील विश्वस्त मंडळ तथा गुरुदेव प्रेमी महिला पुरुष बालक बालिका यांनी सकाळी दहा वाजता पासून तर सायंकाळी पाच वाजता पर्यंत राष्ट्रसंत विश्वधाम टेकडी येथे श्रमदान केले 21/01/2024 रोज रविवारी पातूर येथील राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवाश्रम येथे संत रामराव महाराज तिमान्डे यांचा 75वा जन्मदिवस अर्थात अमृत महोत्सव श्रमदानं दिनाचे आयोजन केल्या गेले होते.

दिनांक 21 जानेवारी 2024 रविवारला गुरुदेव प्रेमी महिला पुरुष बाल बालिका तथा बाहेरगावावरून आलेल्या गुरुदेव प्रेमींनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा आश्रम पासून तर राष्ट्रसंत विश्वधाम टेकडी पर्यंत प्रातःकाळी रामधून काढण्यात आली होती सकाळी कलावंत तथा प्रबोधनकर्ते खंजेरी वादक जयवंतपुरुषोत्तम,तबलावादकगोपालगिरोलकर हार्मोनियम तथा तबला विशारद् भावेश गिरोलकर, सुभाष माहुलीकर ज्येष्ठ भजन गायक सुरेश कोथळकर हार्मोनियम वादक सुहास देवकर ,ओम देवकर ,जय देवकर, गुलाबराव गाडगे आदींनी राष्ट्रसंतांची प्रबोधनात्मक खंजेरी भजन गाऊन प्रबोधन केले.

हा सोहळा उत्साहात सपन्न झाला कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गुलाबराव महाराज जळगाव खान्देश हे लाभले या अमृत महोत्सवा निमित्त अकोला जिल्ह्यातील हाडाचे प्रचारक जेष्ठ कार्यकर्ते ज्यांनी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य अंगीकारून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे विचार त्यांचे साहित्य मानव समाजाला दिशा दाखवीन्याच्या दृष्टिकोनातून आपल्या प्रबोधनातून सामुदायिक प्रार्थना, सामूहिक ध्यान, भजन, ग्रामगीता वाचन, प्रबोधन करून प्रत्येक घरात घरातील प्रत्येकाच्या मनामानात रुजवण्याचा प्रयत्न केला अश्या प्रचारकांचा यावेळी सत्कार करण्यात आला सर्वप्रथम वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज व श्रीसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करून संकल्प गीत गायन करून कार्यक्रमाची सुरवात झाली संत तिमान्डे महाराज यांचा अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर अ. भा. श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी चे वांगमय प्रमुख भानुदास कराळे दादा, राष्ट्रसंत सेवा समिती अकोला चे अध्यक्ष बलदेवराव काका पाटील, डॉ गोवर्धन काका खवले निसर्गोपोचार केंद्र अकोलाचे अध्यक्ष, डॉ अशोक रत्नपारखी जीवन प्रचारक गुरुकुंज, अकोला जिल्हा सेवाधिकारी शिवाजी दादा म्हैसने, उत्तम राव पोहाने दादा संदीपपाल महाराज राष्ट्रीय कीर्तनकार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते संत तीमांडे महाराज यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील संत स्वरूप या अध्यायावर लिहलेल्या ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले अमरावती अकोला वर्धा बुलढाणा, वाशिम आदी जिल्ह्या तून आलेले बहुसंख्य गुरुदेव सेवक, गुरुदेव सेविका, भजनी मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व कार्यक्रम सपन्न झाला दिनांक 20 जानेवारी शनिवार तथा रविवार 21 जानेवारी 2024 या दोन्ही दिवशी गुरुदेव प्रेमी तथा बाहेरगावावरून आलेले मान्यवर आदींची भोजनाची व्यवस्था आणि राहण्याची व्यवस्था आश्रमच्या विश्वस्त मंडळाकडून तथा कार्यकारी मंडळाच्या महिला पुरुषाकडून करण्यात आली होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आश्रम चे विश्वस्त मंडळ तथा कार्यकारी महिला पुरुष मंडळ आदींनी अथक परिश्रम घेतले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: