अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत महागाव बुजुर्ग येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष म्हणून संजय अलोने म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. येथील तंटामुक्त अध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया 12 सप्टेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायत महागाव बुजुर्ग चे सरपंच सौ पुष्पा मडावी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यामध्ये संजय अलोने यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. तालुक्यातील ग्राम पंचायत महागाव बुजुर्ग येते तंटामुक्ती अध्यक्ष निवडीकरिता ग्रामपंचायतची १२ सप्टेंबर रोजी ग्रामसभा होती. या ग्रामसभेत गावातील ग्रामस्थांनी एकमताने गावातील सामाजिक कार्यकर्ते संजय अलोने यांची महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्षपदी निवड केली.
स्व. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून पोलिसांवरील कामाचा ताण कमी तसेच गावातील किरकोळ भांडणे गावातच मिटावीत यासाठी निर्माण केल्या गेल्या आहेत संबंधित ग्रामस्तरावरील ह्या समित्यांनी आज पर्यंत लहान मोठे तंटे गावातच सोडवून अनेक गावांत तंटामुक्ती झालेली आहे.
तंटामुक्ती अध्यक्ष संजय अलोने यांची निवड झाली त्याबद्दल ग्रामपंचायत कडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच संजय चंद्राजी अलोने , सदस्य लालू वेलादी, विनायक वेलादी, वंदना दुर्गे, दिपाली कांबळे, सचिव, ए. बंडावार सह इतर सदस्य उपस्थित होते.