सांगली – ज्योती मोरे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पाकिस्तानचा परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी केलेली अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी म्हणजे पाकिस्तान साठी ही नीचपणाची नवी पातळी ठरली आहे, अशा कडवट शब्दांत प्रतिक्रिया नोंदवत आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर बिलावल यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध केला.
बिलावल भुट्टो यांच्या आक्षेपार्ह विधानांमुळे भडकलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी निषेध फलकांनिशी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. बिलावल भुट्टो मुर्दा बाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान माफी मांगो. अशा घोषणा देत निदर्शने केली.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, प्रदेश सदस्य शेखर इनामदार, निताताई केळकर माजी आमदार नितीन राजे शिंदे, प्रदेश सचिव पृथ्वीराजभैया पवार, संघटक सरचिटणीस दीपक माने, गटनेत्या भारती दिगडे, महिला मोर्चा अध्यक्ष स्वातीताई शिंदे, माजी महापौर संगीताताई खोत, गीताताई सुतार, मुन्नाभाई कुरणे, श्रीकांत तात्या शिंदे,
अल्पसंख्याक प्रदेश सचिव अश्रफ वांकर, नगरसेवक लक्ष्मण नवलाई, संजय कुलकर्णी, विनायक सिंहासने, युवराज बावडेकर, पांडुरंग कोरे, निरंजन आवटी, प्रकाश ढंग, सुब्रावतात्या मद्रासी, नगरसेविका कल्पना कोळेकर, सविता मदने, अनारकली कुरणे, उर्मिला बेलवलकर, सोनाली सागरे, सुनंदा राऊत,
अप्सरा वायदंडे, प्रियानंद कांबळे, इम्रान शेख, गौस पठाण, शहानवाज सौदागर, सुजित राउत, केदार खाडिलकर, अविनाश मोहिते, इमरान शेख, विश्वजीत पाटील, प्रियानंद कांबळे, कयूम शेख, निलेश हिंगमिरे, अश्विनी तारळेकर आदी पदाधिकारी, नगरसेवक, मंडल अध्यक्ष, आघाडी प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते..