Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनरंगसेतू अभ्यासवृत्ती २०२३-२०२४...

रंगसेतू अभ्यासवृत्ती २०२३-२०२४…

नाट्य (लेखन, दिग्दर्शन, अभिनय), संगीत (गायन, वादन, संगीत रचना), नृत्य (सर्व भारतीय अभिजात नृत्यशैली, आधुनिक व प्रायोगिक नृत्य प्रकार) आणि दृश्यकला (चित्र, शिल्प, इंस्टॉलेशन, अन्य) या कलाक्षेत्रांतले शिक्षण पूर्ण करून आता व्यावसायिक म्हणून जम बसवू पाहणाऱ्या महाराष्ट्रातील तरुण कलाकारांसाठी महाराष्ट्र कल्चरल सेंटर ह्या संस्थेने जाहीर केलेली ही एका वर्षाची विशेष अभ्यासवृत्ती आहे.

पूर्ण महाराष्ट्रातून दि. ३१ मे २०२३ पर्यंत अर्ज मागवून, त्यांचे परीक्षण करून प्रत्येक कलाक्षेत्रातील ५ व्यक्तींची निवड मुलाखतींसाठी करण्यात येईल.

पाच तज्ज्ञ समन्वयक दि. १७ व १८ जून २०२३ रोजी दोन दिवसांच्या कार्यशाळेसह मुलाखती घेऊन प्रत्येक कलाक्षेत्रातील एक, अशा एकूण चार कलाकारांची अंतिम निवड ‘रंगसेतू’ अभ्यासवृत्तीसाठी करतील. अभ्यासवृत्ती प्रदानाचा कार्यक्रम दि. १ व २ जुलै २०२३ रोजी होईल.

अभ्यासवृत्तीचे स्वरूप

निवड झालेल्या कलाकारास दरमहा रु.१२०००/- (पूर्ण वर्षात रु. १४४०००/-) अशी अभ्यासवृत्ती मिळेल. दर तीन महिन्यांनी कलाकाराने आपण केलेल्या सर्जनात्मक कामाचा वृत्तांत पाठवणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या समितीने ह्या वृत्तांतास मान्यता दिल्यानंतर अभ्यासवृत्तीचा पुढील हप्ता देण्यात येईल.

अशा प्रकारे एकूण चार हप्त्यांमध्ये ही अभ्यासवृत्ती दिली जाईल. अभ्यासवृत्तीच्या अखेरीस सर्व कलाकारांनी या अभ्यासवृत्तीच्या कालावधीत केलेल्या सर्जनात्मक कामावर आधारित विशेष प्रस्तुती (नाट्याविष्कार, प्रदर्शन, संगीत/नृत्य मैफल, व्हिडीओ/ ऑडीओ प्रॉडक्शन, इ. प्रकारे) महाराष्ट्र कल्चरल सेंटरमध्ये करणे बंधनकारक असेल.

अर्जदाराची पात्रता

  • वयोमर्यादा २२ ते ३५ वर्षे
  • गेली किमान ७ वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य व कलाशिक्षण
  • स्वत:च्या कलाक्षेत्रातील औपचारिक किंवा अनौपचारिक शिक्षण/ पदवी आणि किमान ७ वर्षांचा अनुभव
  • सध्या कलाक्षेत्रात कार्यरत असणे आवश्यक
  • कलाकार कोणत्याही स्वरूपाची पूर्ण वेळ नोकरी / अन्य व्यवसाय करणारा नसावा

अर्ज करण्याची प्रक्रिया
या अभ्यासवृत्तीसाठी दि. ३१ मे २०२३च्या आधी खाली दिलेल्या गूगल फॉर्म्स द्वारे ऑनलाईन अर्ज पाठवावा –
संगीत – https://forms.gle/r4d3qppyHyTqP5DG7
नाट्य – https://forms.gle/A8ehGDXtobcVM7N99
नृत्य – https://forms.gle/7uJWiaPno83C3mjh7
दृश्यकला – https://forms.gle/wnEhm8N9sjxarotv5
अर्जासह आपले छायाचित्र, तसेच आपल्या कलाक्षेत्रात आधीच्या केलेल्या कामाचे नमुने (लेखन/ फोटो/ व्हिडीओ/ ऑडीओ/ यूट्युब लिंक्स) जोडणे आवश्यक आहे.
अर्जासंबंधी काही प्रश्न/शंका असल्यास संपर्काचा ईमेल पत्ता – [email protected]

अटी

  • अर्ज पूर्ण भरलेला असावा.
  • अर्जदारास कोणत्याही प्रकारची शिष्यवृत्ती/पाठ्यवृत्ती सध्या चालू नसावी.
  • ‘रंगसेतू’ अभ्यासवृत्ती मिळाल्यास त्या एका वर्षाच्या काळात धारकास अन्य कोणतीही शिष्यवृत्ती/पाठ्यवृत्ती स्वीकारता येणार नाही.
  • ‘रंगसेतू’ अभ्यासवृत्ती मिळाल्यास त्या एका वर्षाच्या काळात धारकास ही अभ्यासवृत्ती कोणत्याही कारणास्तव सोडता येणार नाही. मात्र धारकाचे काम असमाधानकारक आढळल्यास त्याची अभ्यासवृत्ती बंद/रद्द करण्याचा पूर्ण अधिकार महाराष्ट्र कल्चरल सेंटरकडे राहील.

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज भरण्याची अंतिम मुदत : दि. ३१ मे २०२३
  • दोन दिवसांच्या कार्यशाळेसह मुलाखत व निवड : दि. १७ व १८ २०२३
  • अंतिम निवड जाहीर : २० जून २०२३
  • अभ्यासवृत्ती प्रदानाचा कार्यक्रम : दि. १ व २ जुलै २०२३

आपला मित्र – सतीश देसाई , गणेश तळेकर

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: