Saturday, July 13, 2024
spot_img
Homeराज्यमहाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी कर्मचारी यांचे प्रलंबित मागण्या तात्काळ मंजूर करू...

महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी कर्मचारी यांचे प्रलंबित मागण्या तात्काळ मंजूर करू – श्री. विकास गुप्ता व्यवस्थापकीय संचालक एफडीसीएम नागपूर…

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर – महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी,कर्मचारी संघटना व एफडीसीएम प्रशासन यांची दिनांक 16 मे रोजी एफडीसीएम भवन नागपूर अंबाझरी येथे बैठक आयोजित केली होती सदर बैठकीला वनविकास महामंडळाकडून व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, महाव्यवस्थापक संजीव गौड, ईतर अधिकारी उपस्थित होते,

अधिकारी व कर्मचारी संघटने कडून केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील,कार्याध्यक्ष बी.बी. पाटील, उपाध्यक्ष राहुल वाघ, सरचिटणीस रमेश बलैया, कोषाध्यक्ष अशोक तुंगीडवार, सचिव श्याम शिंपाळे, टेमराज हरिनखेडे, दिनेश आडे, अभिजित राळे,

इतर पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्रातील वन विकास महामंडळ मध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खालील मागण्या संदर्भात प्रशासन व संघटने कडून चर्चा करून सदर मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले.

 1. वन्यजीव अभयारण्य करिता वर्ग करण्यात आलेले महामंडळाचे वनक्षेत्राचे बदल्यात वन विभागाकडून वनक्षेत्र उपलब्ध करून देणे बाबत
 2. महामंडळात महसूल वाढीच्या दृष्टीने टर्नकी अंतर्गत रोपवन कामे घेणे बाबत
 3. एफडीसीएम मधील विविध संवर्गनिहाय 1688 मंजूर पदे (आकृतीबंध) कायम ठेवणे बाबत
 4. सातव्या वेतन आयोग प्रमाणे सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणेबाबत
 5. वनपरिक्षेत्राधिकारी संवर्गासाठी पदोन्नतीचे गुणोत्तर प्रमाण 75:25 करणेबाबत
 6. लेखा सहाय्यक यांना लेखापाल संवर्गात पदोन्नती करता असलेली किमान सेवा अट 5 वर्षाची शिथिल करून 3 वर्ष करण्याबाबत
 7. नागपूर प्रदेशांतर्गत कार्यरत वनरक्षक यांना वनपाल या पदावर पदोन्नती देणे बाबत
 8. वाहन चालक ते लिपिक संवर्गात कायमस्वरूपी संवर्ग बदली करिता बीकॉम उत्तीर्ण ही शैक्षणिक अट शिथिल करणे बाबत
 9. वाहन चालक या संवर्गातून वनरक्षक संवर्गात नियुक्ती देणे बाबत
 10. नाशिक प्रदेशांतर्गत अनुकंपा तत्त्वावरील धोरणांची अंमलबजावणी करणे बाबत
 11. नागपूर प्रदेशांतर्गत अनुकंपा तत्त्वावरील प्रकरण निकाली काढण्याबाबत
 12. लिपिक,लेखा सहाय्यक यांना प्रशिक्षण देणेबाबत
 13. अप्रशिक्षित वनपाल यांना प्रशिक्षणाकरिता पाठविण्याबाबत
 14. आती संवेदनशील व संवेदनशील क्षेत्राकरिता एफडीसिएम मधील वनपाल वनरक्षक यांना मदतनीस सहाय्यक देणेबाबत
 15. एफडीसीएम वसाहतीतील निवासस्थानाची दुरुस्ती, नवीन निवासस्थान बांधकाम करणेबाबत
 16. सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित दावे निकाली काढणे बाबत
 17. भविष्य निर्वाह निधीचे संबंधाने विभागीय कार्यालयाच्या स्तरावर यंत्रणा स्थापित करणे बाबत
 18. ठाणे वन प्रकल्प विभागातील प्रलंबित प्रकरणे निकालने बाबत
 19. महामंडळाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी स्तरावर वनसंरक्षणाकरिता वाहन उपलब्ध करून देणे बाबत
 20. वनपाल,वनरक्षक यांना नियमित गणवेश भत्ता देणेबाबत
 21. महामंडळात रिक्त असलेली वनरक्षक व लिपिक यांची पदभरती करणे बाबत

वरील प्रमाणे वनविकास महामंडळाच्या अधिकारी कर्मचारी यांच्या रास्त मागण्या प्रशासनाकडून तात्काळ मंजूर करू असे आश्वासन व्यवस्थापकीय संचालक यांनी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले सदर बैठकीत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या संघटनेचे अध्यक्ष अजय भाऊ पाटील यांनी मांडून त्या निकाली काढण्याचे आश्वासन दिल्याने प्रशासनाचे संघटनेकडून आभार व्यक्त केले तसेच संघटनेला बैठक देऊन अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्याने संघटनेचे उपाध्यक्ष राहुल वाघ यांनी आभार प्रदर्शन करून बैठकीची सांगता केली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: