Monday, December 23, 2024
Homeराज्यताई गोळवलकर महाविद्यालयात रान भाजी महोत्सव...

ताई गोळवलकर महाविद्यालयात रान भाजी महोत्सव…

रामटेक – राजु कापसे

पावसाळ्यात शेतात व जंगलात अनेक गुणधर्म नी औषधीयुक्त वनस्पती उगतात या रानभाज्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात कारण त्यात मोठ्या प्रमाणात जीवनसत्व खनिज द्रव्य व शरीराला आवश्यक प्रथिन व सर्व प्रकारच्या औषधी गुणधर्म असतात त्यासाठी या वनस्पतींची ओळख त्यांचे उपयोग गुणधर्माच्या बाबतीत प्राथमिक माहिती असणे गरजेचे असल्याने ताई गोळवलकर महाविद्यालयामध्ये 31 जुलै 2024 बुधवार ला वनस्पती विभागातर्फे ,विभाग प्रमुख प्रा .स्वतंत्रता शर्मा कामदार यांच्या मार्गदर्शनात बीएससी द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी पावसाळी रानभाज्या महोत्सव आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेश सिंगरू होते. ते म्हणाले या रानभाज्या निसर्गाने दिलेल्या उपहार आहेत.

त्याचा वापर आपण कटाक्षाने करायलाच हवा, ते आपल्या शरीराला आवश्यक पोशक घटक देण्याची कार्य करतात. त्यांचे महत्त्व समजून त्यांच्या वापर केल्यास नक्की शरीर बलवान होण्यास मदत मिळते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिया हिरोडी ने केले. रानभाज्या बद्दल माहिती प्रांजल भाकरे व आभार प्रदर्शन सुनाक्षी उपराडे ने केले. त्यानंतर बॉटनिकल सोसायटीची संपूर्ण माहिती प्रा .हर्षवर्धन खोब्रागडे यांनी दिली.

कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीरित्या पार पडण्याकरिता वनस्पती विभागाच्या प्रा. श्रीकांत चौधरी आणि डॉ.मनोज बडवाईक व प्रयोगशाळा परिचर उमेश गयगये,यानी प्रयत्न केले. यावेळी कधी न पाहिलेला रानभाजी ओळख तसेच शास्त्रशुद्ध माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: