Thursday, June 20, 2024
spot_img
Homeराज्यरामटेक | वाहनचा धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू...

रामटेक | वाहनचा धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू…

रामटेक – राजु कापसे

रामटेक :- नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग प्राथमिक आरोग्य केंद्र मनसर समोर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत भिल्लेवाडा येथील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. माहितीनुसार, मृतक जगदीश रामुजी निमरड वय ४४ वर्ष. रा.भिल्लेवाडा ता.रामटेक येथील रहिवासी मनसर येथे साक्षगंधाच्या कार्यक्रमाकरिता गेले होते.

साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपून ७ वाजताच्या सुमारास आपल्या दुचाकी क्रमांक एमएच ३५ डब्लु ६२३६ नी घरी परत येत असताना मनसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोरील महामार्गावर एका भरदाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

रामटेक पोलीस स्टेशन चे अधिकारी घटना स्थळी पोहचूण पंचनामा करण्यात आला. मृतकाला स्थानिक नागरिकांनी शवविच्छेदन करिता उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे नेण्यात आले असून शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले.

अज्ञात वाहन चालकावर अप क्र. २७९/२४ कलम २७९,३०४ (अ) भादवी, सहकलम १३४ (अ) १३४ (ब) मोवाका गुन्हा दाखल करण्यात आला असुन मा. पोनी साहेबांचे आदेशाने स. पो.निरीक्षक खडसे पुढील तपास करीत आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: