रामटेक – राजू कापसे
दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,(बार्टी) पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्प, तालुका रामटेक व परीवर्तन मंच, रामटेक यांच्या वतीने ‘संविधान दिन ते प्रजासत्ताक दिन’ पर्यंत संविधानाचे ज्ञान व माहिती विद्यार्थ्यांना व्हावी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळावे या हेतूने ‘तालुकास्तरीय संविधान प्रश्नमंजुषा’ कार्यक्रम महात्मा गांधी कला व वाणिज्य महाविद्यालय, पारशिवणी, येथे आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून तसेच महाराष्ट्र गीताने करण्यात आली.सदर कार्यक्रमात कृती फेरी, स्पष्टीकरण फेरी,झटपट फेरी, विस्तारीत फेरी व नाद फेरी अश्या पाच फेरी घेण्यात आल्या.सदर प्रश्न मंजुषा हसत खेळत सादरीकरण रामटेक तालुका समतादूत राजेश राठोड यांनी केले.तर कार्यक्रमाचे नियोजन व संचालन पारशिवणी तालुका समतादूत शुभांगी टिंगणे यांनी केले.
स्पर्धेचे परीक्षण परीवर्तन मंचाचे उपाध्यक्ष भाऊराव भिलावे, कोषाध्यक्ष राहुल जोहरे व मौदा तालुका समतादूत दुर्योधन बगमारे यांनी निष्पक्षपणे केले.स्पर्धेसाठी कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्याय मंडळ असे तीन गट तयार करण्यात आले. यात महात्मा गांधी कला व वाणिज्य महाविद्यालय पारशिवणी व साईबाबा महाविद्यालय पारशिवणी व साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय पारशिवणी येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
प्रथम क्रमांक कार्यकारी मंडळातील प्रियांश अमरलाल सुहागपुरे,वैष्णवी सुभाष सुरजपारे व निखिल फगन ईनवाते या साईबाबा विज्ञान महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी पटकावला तर दुसरा क्रमांक कायदे मंडळातील श्रावणी संजय फुलबांधे, वैष्णवी नरेश मेंघर व साक्षी भोजराज दियेवार या साईबाबा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, पारशिवणी येथील विद्यार्थ्यांनी व तृतीय क्रमांक न्याय मंडळातील मयुरी राजू मेश्राम,धिरज रमेश देशभ्रतार व उन्नती रामदास भोयर या महात्मा गांधी कला व वाणिज्य महाविद्यालय, पारशिवणी येथील विद्यार्थ्यांनी पटकावला.
सहभाग करीता अंजल गणेश कोसरे व मयुरी रामराव बोरकर यांना व सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी प्राचार्य ज्ञानेश्वर खडसे,डॉ. ज्ञानेश्वर शेंडे,डॉ.राकेश कभे,डॉ.मनिष चव्हाण,प्रमोद गोरडे, डॉ.सुधीर कहाते,विजया वानखेडे,महेश चोंदे, महेंद्र भलमे,संदीप भोयर, सचिन रामटेके व साईबाबा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक फुलबांधे तसेच असंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार कार्यक्रम संयोजक महेंद्र भलमे यांनी मानले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सदर उपक्रमासाठी बार्टीचे महासंचालक सुनील वारे, विभाग प्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण, निबंधक इंदिरा अस्वार, सह व्यवस्थापक नसरीन तांबोळी, मुख्यालयातील प्रकल्प अधिकारी जागृती गायकवाड व नागपूर जिल्हा प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले यांनी मार्गदर्शन केले.