Sunday, June 23, 2024
spot_img
Homeराजकीयशिक्षकच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देतात - पं.स.सभापती संजय डांगोरे...

शिक्षकच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देतात – पं.स.सभापती संजय डांगोरे…

आजनगांव येथे केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा

नरखेड – अतुल दंढारे

दि २० डिसेंबर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी हा सर्वगुणसंपन्न व संस्कारशील असतो.शिक्षकच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी तयार करतो म्हणून शिक्षकांचे उपकार आयुष्यभर फेडता येत नाही असे प्रतिपादन पंचायत समिती सभापती संजय डांगोरे यांनी मेंढेपठार केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी जि.प.उच्च प्राथमिक शाळा, आजनगांव येथे केले.

कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून सभापती संजय डांगोरे , अध्यक्षस्थानी आजनगांव सरपंच अश्विनीताई नागमोते तर प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती निशिकांत नागमोते, गटशिक्षणाधिकारी नरेश भोयर, उपसरपंच तुळसाबाई दिडशे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दशरथ सहारे, ग्रामसेविका प्रियाताई पाटील, केंद्रप्रमुख रामभाऊ धर्मे,पोलीस पाटील वामन वंजारी, धर्मेंद्र तायवाडे,मारोती गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी केंद्रातील सर्व मुख्याध्यापकांचा ग्रामपंचायत व उपसभापती निशिकांत नागमोते यांचे सौजन्याने शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यात कल्पना मांडवकर (मेंढेपठार),मोरेश्वर खरळकर(कोंढासावळी),मनोहर पठाडे (आजनगांव),अंबादास नारनवरे(चिखली माळोदे),सिद्धार्थ लांडगे(माहूरखोरा),माणिक नाईक (गरमसुर),गणेश कोचे (शेकापूर),मुरलीधर गजबे(वाजबोडी), मिलिंद यावलकर (मरगसुर),राजेंद्र टेकाडे(आलागोंदी) यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविक रामभाऊ धर्मे, संचालन निलिमा दुपारे व राजेंद्र टेकाडे तर आभार प्रदर्शन मनोहर पठाडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता वैशाली गहुकर,रुपाली कांबळे, जयदेव बोपटे, उमेश ढोले, गिरीष उईके,गोपाल नेहारे, संजय चिखले, बेबी शिरपूरकर, जान्हवी लांडे,अंताक्षरी चिखले,सुषमा कुंभारे आदींनी सहकार्य केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: