राजु कापसे
रामटेक
रामटेक : महाराष्ट्र राज्याच्या वतीने महसूल सप्ताह चे आयोजन करण्यात आले असुन त्यानुसार स्थानिक तहसील कार्यालयामध्येही या सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान काल दि. ७ ऑगस्ट ला महसुल सप्ताह चा समारोपीय कार्यक्रम पार पडला. सप्ताहादरम्यान विविध कार्यक्रम पार पडले.
१ ते ७ ऑगस्ट दरम्यान हे आयोजन करण्यात आले होते. सप्ताह दरम्यान एक ऑगस्टला महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला यानंतर दोन ऑगस्टला ‘ युवा संवाद ‘ हा कार्यक्रम घेण्यात आला तर तीन ऑगस्टला ‘ एक हात मदतीचा ‘ हा कार्यक्रम घेण्यात आला तर चार ऑगस्टला ‘ जनसंवाद ‘ हा कार्यक्रम घेण्यात आला तर पाच ऑगस्टला ‘ सैनिक हो तुमच्यासाठी ‘ हा कार्यक्रम घेण्यात आला तर सहा ऑगस्टला ‘ महसूल संवर्गातील कार्यरत तथा सेवानिवृत्त कर्मचारी – अधिकारी संवाद ‘ हा कार्यक्रम घेण्यात आला.
काल दि. ७ ऑगस्टला या सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षा म्हणून एस.डी.ओ. वंदना सवरंगपते ह्या तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार आशिष जयस्वाल हे उपस्थित होते. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार आशिष जयस्वाल व इतर मान्यवरांकडुन सत्कार करण्यात आला. नवनियुक्त कोतवालांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन नायब तहसीलदार कुलदीवार यांनी केले. कार्यक्रमात तहसिलदार हंसा मोहने, बि.डी.ओ. जयसिंग जाधव, रामटेक चे पोलीस निरीक्षक हृदयनारायन यादव, पारशिवनीचे पोलीस निरिक्षक सोनवाने, न.प. रामटेक मुख्याधिकारी पल्लवी राऊत, नगर पंचायत पारशिवनी च्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी, नायब तहसीलदार भोजराज बडवाईक, लिपीक बागडे, कोतवाल रोशन ठकरेले यांचेसह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.