रामटेक – राजु कापसे
कविकुलगुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (किट्स) रामटेक येथे “प्रोजेक्ट मैनेजमेंट अँड वेरियस एस्पेक्ट ऑफ प्रोजेक्ट” या एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन नुकतेच विद्युत अभियांत्रिकी विभागाचा वतीने करण्यात आले.
चर्चासत्राचे उद्घाटन सीएच इंटरप्राईजेस कन्सल्टंट वडोदरा गुजरात या उद्योग समूहाचे संस्थापक आकाश त्रिवेदी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची अध्यक्षता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यांनी केली. या वेळी प्रामुख्याने विद्युत अभियांत्रिकी शाखेच्या विभाग प्रमुख डॉ. स्नेहल पाचपोर,विविध्य विभागाचे विभाग प्रमुख, डीन, प्राधापक व विद्यार्थी मोठ्या संखेत उपस्थित होते.
आकाश त्रिवेदी यांनी प्रथम सत्रात महाविद्यालयाच्या विभागप्रमुख व प्राध्यापकांसी संवाद साधला. मुख्यत्वेकरून आजच्या काळातील उद्योग व शिक्षण क्षेत्रात असलेल्या त्रुटी, अडचणी व आव्हाने यावर कशाप्रकारे मात करता येईल यावर विस्तृत मार्ग दर्शन केले. दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांशी सफल प्रकल्प आयोजन व नियोजनाबद्दलच्या विविध पैलूंवर चर्चा केली. तसेच प्रकल्प यशस्वी करण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे म्हणाले की अशा प्रकारचा आयोजना मुळे प्राध्यापक व विद्यार्थी यांना अद्ययावत तंत्रद्यानाची माहिती मिळेल. प्रास्ताविक डॉ. स्नेहल पाचपोर यांनी केले. संचालन प्रा. श्रीपाद क्षीरसागर यांनी केले प्रा. भानुदास टाले व अंतिम वर्षातील विद्यार्थी यांनी या आयोजनासाठी कठोर परिश्रम घेतले.